ponda Hotmix Asphalting Work Launched by Agriculture Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Ponda Development : फोंड्यात साडेपाच कोटी खर्चून रस्ता - रवी नाईक

हॉटमिक्स डांबरीकरण सुरू : कृषिमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : मतदारसंघात विविध विकासकामे साकारत असून रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणालाही प्रारंभ झाला आहे. साडेपाच कोटी रुपये खर्चून फोंडा बसस्थानक व बाजारपेठेतील मुख्य रस्त्याबरोबरच प्रभूनगर - कुर्टीतील रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात येत आहे. फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न राहिला असून स्वच्छ व वाहतुकीसाठी योग्य असे रस्ते उपलब्ध करून देताना आपल्याला आनंद होत असल्याचे उद्‍गार फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.

वारखंडे - फोंडा येथील हनुमान देवालय ते वरचा बाजार भागापर्यंतच्या हॉटमिक्स डांबरीकरण तसेच प्रभूनगर - सपना पार्कमधील रस्त्याच्या कामाला आज (शुक्रवारी) कृषिमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक तसेच कुर्टी - खांडेपार पंचायतीचे पंच सदस्य नीळकंठ नाईक, हरिश नाईक, मनिष नाईक इतर पंच सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कंत्राटदार आणि नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही फोंडा शहरातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण होत असल्याने फोंडावासीयांना चांगले रस्ते उपलब्ध होतील, असे सांगितले. पंच सदस्य नीळकंठ नाईक यांनीही हे डांबरीकरण नागरिकांना आता सोयिस्कर ठरेल, असे मत व्यक्त केले.

रवी नाईक म्हणाले की, फोंड्यातील रस्त्यांचे काम बराच काळ लांबले होते. फोंड्यातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने लोकांना खराब रस्त्यांना तोंड द्यावे लागले, पण आता ही स्थिती सुधारत असून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असून फोंड्यातील बहुतांश रस्त्यांचे हॉटमिक्स करण्यात आले आहे, फक्त मुख्य रस्ता आणि इतर भाग तेवढा हॉटमिक्स डांबरीकरणाविना राहिला होता, तो आता पूर्णत्वास येत असून फोंडावासीयांना चांगल्या सुविधा देण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही रवी नाईक यांनी दिली.

-सुविधा देण्यास मी कटिबद्ध : रवी नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT