Ponda News : फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ लोकांना उपयुक्त

रेबिज रोगावर उपचार करणारे राज्यातील हे पहिलेच इस्पितळ ठरले असून त्यामुळेच आयडी इस्‍पितळ हे नाव या इस्पितळाला लाभले.
 फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ
फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : अंत्रुज महाल अर्थातच फोंडा तालुक्यातील तिस्क-फोंडा येथील उपजिल्हा म्हणजेच आयडी इस्पितळ सध्या सर्वप्रकारच्या रुग्णसेवेसाठी तालुक्याबरोबरच लगतच्या भागातील लोकांना उपयुक्त ठरले आहे. या इस्पितळाची पुनर्बांधणी केल्यानंतर १९ डिसेंबर २०१२ मध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.

फोंडा तालुक्यात तसे पाहिले तर फोंडा इस्पितळाबरोबरच मडकई, शिरोडा आणि बेतकी - खांडोळा अशा तीन ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. फोंडा तालुक्याच्या वेशीवरच पिळये-तिस्क येथील आरोग्य केंद्रही आरोग्यसेवेत कार्यरत असून एखाद्या अपघात किंवा तत्काळ आरोग्यसेवेसाठी ही आरोग्य केंद्रे उपयुक्त ठरली आहेत.

 फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ
Ponda News: ढवळी येथील भंगारअड्ड्यातच ठोकलाय तळ, जेवण तिथेच रसायनांचे बॅरल्सही

रेबिज रोगावर उपचार करणारे राज्यातील हे पहिलेच इस्पितळ ठरले असून त्यामुळेच आयडी इस्‍पितळ हे नाव या इस्पितळाला लाभले. आयडी म्हणजेच उपजिल्हा इस्पितळात सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्यासाठी विद्यमान सरकारने मोठे प्रयत्न केले आहेत. तरीही या इस्पितळात आता रक्तपेढीची आवश्‍यकता भासत आहे.

‘कोविड’वेळी फायद्याचे

कोविड महामारीवेळी फोंड्याच्या या उपजिल्हा आयडी इस्पितळात पूर्ण एक मजला कोविड बाधितांसाठी आवश्‍यक उपकरणांसह सज्ज ठेवण्यात आला होता आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे कोविड महामारीवर मात करणे रुग्णांना शक्य झाले.

 फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ
Minister Ravi Naik in Ponda : ‘पीईएस’ रवी नाईक कॉलेजला ‘ए प्लस’ दर्जा

रोज किमान तीनशे रुग्ण

फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात रोज किमान तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात येते. विशेष म्हणजे रुग्णांसाठी पावणे दोनशे बेडस् उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या या इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. जयश्री मडकईकर कार्यभार सांभाळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com