Minister Ravi Naik in Ponda: विजेबाबतीत फोंड्यात लवकरच स्वयंपूर्णता : कृषिमंत्री रवी नाईक

भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
Minister Ravi Naik in Ponda
Minister Ravi Naik in PondaDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Ravi Naik in Ponda: राज्याला दूध, वीज, पाणी आदीसारख्या सुविधा या फोंड्यातूनच उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

आता विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होताना फोंड्यात वीजग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वीज खात्याने प्रयत्न चालविले असल्याचे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

फोंड्यातील शांतीनगर येथील सभागृहात (गुरुवारी) वीज खात्यातर्फे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

(Self-Sufficiency in Electricity For Ponda says Agriculture Minister Ravi Naik in Ponda)

Minister Ravi Naik in Ponda
Goa AAP Campaign: आम आदमी पक्ष राज्‍यात राबवणार ‘मोदी हटाव-देश बचाव’ अभियान

त्यावेळी रवी नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, कुर्टी-खांडेपार सरपंच नावेद तहसीलदार, स्थानिक नगरसेविका गीताली तळावलीकर, नगरसेवक शांताराम कोलवेकर, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक तसेच वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस व केशव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपा मिरिंगकर यांनी केले तर प्रवीण केरकर यांनी आभार मानले.

पुढील खासदार नरेंद्र सावईकरच!

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्यात विकासकामे सुरू आहेत. येत्या निवडणुकीत पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी गोव्यातील दोन्ही खासदार हे भाजपचेच हवेत.

दक्षिण गोव्यासाठी पुढील खासदार हे नरेंद्र सावईकरच असतील, असे वाटते; पण निर्णय केंद्र समिती घेईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

Minister Ravi Naik in Ponda
Sadetod Nayak : भाजपसमोर ‘लोटांगण’ घालणाऱ्या संघाची अवनती

केंद्रातील भाजप सरकारमुळे गोव्याला विकास-कामांसाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर गोव्यासाठी आपला हात सढळ ठेवला असल्यामुळे राज्यात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे हात बळकट करण्याची गरज आहे.

- रवी नाईक, कृषिमंत्री

विकासकामे ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असून गोव्यात केंद्र सरकारकडून चांगले सहकार्य मिळत असल्याने अशाप्रकारची कामे होत आहेत. भविष्यात ही कामे सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

- नरेंद्र सावईकर, एनआरआय आयुक्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com