Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

Valpoi Goa: एकदा हाँटमिक्स रस्ता केला की ते रस्ता किमान पाच वर्षे या रस्त्यांची पुन्हा खोदाई होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे नियोजन करावे अशी मागणी वाळपईतील जनतेकडून होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: वाळपई नगर पालिका क्षेत्रात सरकारतर्फे रस्ते करणे, गटारे बांधणे अशी विकास केली जातात. पण ही कामे करताना पुढील पाच वर्षांसाठी टिकतील, अशा पद्धतीने त्यांचे योग्य ते नियोजन करावे. अन्यथा कामांवर खर्च करून त्याचा फटका जनतेलाच बसेल, असे काही नागरिकांनी सांगितले.

एकदा हाँटमिक्स रस्ता केला की ते रस्ता किमान पाच वर्षे या रस्त्यांची पुन्हा खोदाई होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे नियोजन करावे अशी मागणी वाळपईतील जनतेकडून होत आहे. कारण अनेकवेळा एकदा रस्ता केला की काही महिन्यांनी अन्य कामांसाठी त्याच रस्त्यांच्या बाजूने, कधी मधूनच खोदाई केली जाते.

प्रसंगी नवा रस्ताही खोदकामामुळे खराब होत असतो. सध्या वाळपई नगरपालिका क्षेत्रात वाळपई बाजार पेठ व नगरगाव मार्गावरील वेळूस येथे गटारे बांधणे, रस्त्यांलगत खोदकाम करून केबल्स घालणे अशी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ही कामे झाल्यानंतर हॉटमिक्स रस्ता केला जाईल. रस्ता खोदाईकाम होणार नाहीत, याचे आताच नियोजन प्रशासनाने केले पाहिजे.

वाळपईत सध्या रस्त्यालगतच खोदकाम करून केबल्स घालण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. अशा केबल्स घालण्यासाठी गटार बांधणी प्रमाणे स्वतंत्र व्यवस्था कायम स्वरुपी केली पाहिजे. व केबल्स घालण्यासाठी केलेल्या जागी सिमेंटच्या लाद्या घालून ठेवाव्यात. जेणेकरून पुन्हा पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची गरज भासणार नाही. रस्ता खोदकामामुळे जवळील दुकानांत, घरांत धूळ जाते. लोकांनाच याची झळ बसते, लोक प्रतिनिधींना नव्हे.

- ॲड. भालचंद्र मयेकर, वाळपई

वाळप‌ई बाजार क्षेत्राचे रस्ते हे पोर्तुगीज काळातील रितसर नियोजित केलेले रस्ते असून, आता आमच्या सरकारने पण भूमिगत वीज‌ वाहिनी, दूरध्वनी वाहिनी,गटार कामे,जल वाहिनीची कामे करताना योग्य नियोजन करण्याची गरज आहे. या सर्व संबंधित खात्यांचा समन्वय नसल्याने जनतेचा पैसा वाया जात आहे. एकात वर्षात तीन- चार वेळा नवीन रस्ते खोदून सरकारी तिजोरीवर बोजा पडतो.सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाळप‌ईवासीयांना सध्या नाहक त्रास सोसावा लागत आहे. सरकारने येणाऱ्या ५० वर्षांचे अभ्यासपूर्ण नियोजन करून ही कामे करावीत.

विश्वेश प्रभू, नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

Commonwealth Games 2030: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'क्रिकेट'चे सामने होणार?सामन्यांसाठी अहमदाबाद नव्हे तर 'या' शहराची निवड

Goa Live Updates: अवजड ट्रकची स्कॅनरला धडक, नशेत होता चालक

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

SCROLL FOR NEXT