Premendra Shet, Lairai Temple Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatrotsav: लईराईच्या जत्रेपूर्वी शिरगावातील रस्ते होणार चकाचक! 1.20 कोटी रुपये खर्चून हॉटमिक्स डांबरीकरण

Lairai Temple Shirgao: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेपूर्वी शिरगावमधील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला.

Sameer Panditrao

डिचोली: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेपूर्वी शिरगावमधील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे १.२० कोटी रुपये खर्च करुन शिरगावमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. आज गुरुवारी (ता. १७) आमदार प्रेमेंद्र शेट यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता चिमुलकर, स्थानिक सरपंच वेदिका शिरगावकर, उपसरपंच सूर्यकांत पाळणी, पंचसदस्य देवराज गावकर, मयेचे माजी सरपंच विजय पोळे, पंचसदस्य विशांत पेडणेकर, पिळगावचे पंच सुनील वायंगणकर, भाजप मंडळाचे विश्वास चोडणकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री लईराई देवीच्या जत्रा काळात शिरगावात भक्तांचा महापूर लोटत असतो. या भक्तांची गैरसोय होता कामा नये. यासाठी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जत्रेपूर्वी गावातील रस्ते चकाचक होणे आवश्यक होते, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगून या कामाला सहकार्य केल्याबद्धल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले.

मये मतदारसंघातील गावागावांतील रस्ते चकाचक करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही आमदारांनी दिली. शिसूर्यकांत पाळणी यांनी सरकारसह आमदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT