court Dainik Gomantak
गोवा

मेरशी खारफुटीच्या क्षेत्रात मातीचा भराव टाकून केला रस्ता; 8 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश

चारही गावांमधील मॅपिंग व सर्व्हे चौकशी करण्यासाठी त्वरित कृती दल स्थापन करून या सर्व्हेचा अंतरिम अहवाल तीन आठवड्यांनी सादर करावा.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मेरशी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने असलेल्या खारफुटीच्या क्षेत्रात मातीचा भराव टाकून केलेला रस्ता व बांधकामाचा सर्वे सरकारची कृती समिती व उपजिल्हाधिकाऱ्यांनी करून त्याचा अहवाल येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी दिले.

मेरशी पंचायतीमधील मुर्डा, मोरंबी ओ पिकेन, रेनावडी व मोरंबी ओ ग्रँडे या गावातील खाजन जमिनी, मिठागरे तसेच खारफुटीच्या कत्तलप्रकरणी या भागात बांधकाम करण्यास स्थगिती दिली असताना या परिसरात काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याची माहिती याचिकादाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्याच दखल घेत वरील निर्देश दिले आहेत.

मेरशी पंचायत क्षेत्रातील खारफुटींची कत्तल होऊनही पर्यावरण कायद्यानुसार सरकारने कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली होती. या चारही गावांमधील मॅपिंग व सर्व्हे चौकशी करण्यासाठी त्वरित कृती दल स्थापन करून या सर्व्हेचा अंतरिम अहवाल तीन आठवड्यांनी सादर करावा.

नव्याने परवाने देण्यास स्थगिती

खंडपीठाच्या पुढील आदेशापर्यंत मेरशी पंचायतीमध्ये कोणत्याही खात्याने नव्याने परवाने व ना हरकत दाखले देऊ नयेत. जर तेथे बांधकाम सुरू असल्यास ते त्वरित बंद करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते.

मात्र, काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्याने यासंदर्भातची माहिती देण्यास उपजिल्हाधिकारी व कृती समितीला सांगितले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT