Ro-Ro Service Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटीचा वेगाचा ‘रेकॉर्ड’! प्रवाशांची प्रचंड गर्दी; बघ्यांची 'संख्या' वाढली

Chorao Raibandar Ro-Ro Ferry: डिचोली, सत्तरी तालुक्यात बहुतांश नागरिक म्हापसा व माशेलहून जाण्याऐवजी या जलमार्गाचा वापर अधिक करत आहेत. त्यामुळे दररोज फेरीबोटीत गर्दी वाढत आहे.

Sameer Panditrao

तिसवाडी: चोडण - रायबंदर जलमार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरीबोटीत प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे या फेरीबोटीत चोडणवासीय प्रवासी कमी आणि केवळ नव्या फेरीबोटीचा आनंद लुटण्यासाटी गर्दी करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.

डिचोली, सत्तरी तालुक्यात बहुतांश नागरिक म्हापसा व माशेलहून जाण्याऐवजी या जलमार्गाचा वापर अधिक करत आहेत. त्यामुळे दररोज फेरीबोटीत गर्दी वाढत आहे. त्यामुळे नदी काठावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहे.

या फेरीबोटीत इतर ठिकाणच्या नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे चोडणवासीयांना रांगेत ताटकळत रहावे लागत आहे. या फेरीबोटीतील काही नवीन कर्मचारी नियमांचे पालन करत नसल्याने प्रवासी गर्दीवर नियंत्रण रहात नाही.

या फेरीबोटीत १६ चारचाकी गाड्यांसाठी प्रयोजन केलेले असताना दुचाकीस्वारांनीच फेरीबोट भरत आहे व चारचाकी वाहनचालकांना नदी काठावर रांगेतच उभे रहावे लागत आहे. त्यामुळे नको ती रो-रो सेवा पूर्वीचीच सेवा चांगली होती असे मत हे प्रवासी व्यक्त करत आहेत.

यासंदर्भात नदीपरिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंग भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, की रो-रो फेरीबोटीची संकल्पना सर्वांनाच नवीन आहॆ. या फेरीबोटीवरील कर्मचारी नविन आहेत. स्वतः मी व या फेरीबोट कंपनीचे मालक स्वतः चोडण व रायबंदर धक्यावर जातीने लक्ष देत असून येत्या एक दोन दिवसांत यात सुधारणा होईल.

या रो-रो फेरीबोटीत काल प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने आज सकाळी व संध्याकाळी झुन्या तीन फेरीबोटी या जलमार्गावर सुरू केल्याने आज सकाळी वाहतूक सुरळीत झाली. आज संध्याकाळी ६ वाजता रायबंदर धक्क्यावर प्रचंड गर्दी दिसली. दुचाकीस्वारांनी रांगेत न राहता थेट फेरीबोटीत प्रवेश केल्याने रो-रो फेरीबोट दुचाकी वाहनांनी व्यापून केली. एकाही चारचाकी वाहनाला प्रवेश मिळाला नाही. यावर शिस्त आणण्यासाठी आणखी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी चोडणवासीय करीत आहेत.

वेगाचा ‘रेकॉर्ड’

चोडण धक्क्यावर गुरुवारी एक रुग्णवाहिका रायबंदरला जाण्यासाठी आली असता या रुग्णवाहिकेला त्वरित ‘द्वारका’ रो-रो फेरीबोटीत प्रवेश देण्यात आला.

विशेष म्हणजे ही फेरीबोट ३ मिनिटे १५ सेकंदात रायबंदर धक्क्यावर पोचली. किमान वेळेपेक्षा दोन मिनिटे आधी ही फेरीबोट रायबंदर धक्क्यावर पोचली व वेगाचा एकप्रकारे रेकॉर्डच केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे त्रस्त

Chandra Grahan 2025: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण! दिसणार 'ब्लड मून'चा थरार; जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

त्यावेळी कोळसा प्रदूषणात वाढ होणार हे माहीत नव्हते का? रेल्वे दुपदरीकरणाचा DPR काँग्रेसच्या काळात; ढवळीकरांचा घणाघात

Goa Vacation: 'गोवा म्हणजे माझं दुसरं घर...'!; ओम शांति ओम फेम अभिनेत्रीनं रिता केला आठवणींचा खजिना; बाळासोबतची पहिली ट्रीप खास

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये हार्दिक पांड्या पाडणार षटकारांचा पाऊस, विराट-रोहितच्या क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT