Ro Ro Ferryboat Goa Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

Ro Ro Ferryboat Goa: नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या फेरीबोटींची निर्मिती केली आहे. जुन्या फेरीमध्ये चारचाकी वाहने आणि पंधरा ते वीस दुचाकी सामावत होत्या.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील जलमार्गांवर आधुनिक पद्धतीने प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी ‘बांधा व वापरा’ या तत्त्वावर बांधून घेतलेल्या वातानुकुलित रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ सोमवार, १४ जुलै रोजी रायबंदर-चोडण जलमार्गावर होणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील, अशी माहिती अंतर्गत जलमार्ग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

रायबंदर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले, विजय मरीनचे मालक सूरज दहलानी उपस्थित होते. ‘द्वारका’ आणि ‘गंगोत्री’ या दोन्ही रो-रो फेरीबोटींची बांधणी विजय मरीनने केली आहे.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या फेरीबोटींची निर्मिती केली आहे. जुन्या फेरीमध्ये चारचाकी वाहने आणि पंधरा ते वीस दुचाकी सामावत होत्या. मात्र, आता चार फेरीबोटींचा बोजा एक रो-रो फेरीबाट घेणार आहे. रायबंदर ते चोडण या प्रवासाला अवघी पाच ते सात मिनिटे लागणार आहेत.

फेरीबोटीची वैशिष्ट्ये अशी

१. रो-रो फेरीबोटीमधून एकाचवेळी १५ कार, ४० दुचाकी आणि १०० लोक प्रवास करू शकतील.

२. फेरीबोटीमध्ये प्राथमिक उपचारसेवाही उपलब्ध असेल. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित कर्मचारीही बोटीवर तैनात असतील.

३. दोन्ही फेरीबोटींच्या कॅप्टनना १०० तासांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री दहा वाजेपर्यंत या ही फेरीबोट सेवा सुरू राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT