Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Rivona: दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, ‘त्या’ शेतमालक महिलेला अटक; बेकायदा फेन्सिंगमुळे घडली दुर्घटना

Rivona brothers death: शिवसुरे-रिवण येथे २७ ऑगस्ट रोजी ऐन गणेश चतुर्थीच्या रात्री शिवसुरे गावातील दोन सख्ख्या भावांचा शेतात टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Sameer Panditrao

केपे: शिवसुरे-रिवण येथे २७ ऑगस्ट रोजी ऐन गणेश चतुर्थीच्या रात्री शिवसुरे गावातील दोन सख्ख्या भावांचा शेतात टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी केपे पोलिसांनी शिवसुरे येथील शेतजमीन मालक जया बापू गावकर (वय ६४ वर्षे) हिला अटक केली आहे.

२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीदिवशी सायंकाळी शिड्डे-पांडवसडा येथील राजेंद्र काशिनाथ गावकर (वय ४६ वर्षे) आणि त्याचा धाकटा भाऊ मोहनदास काशिनाथ गावकर (वय ४० वर्षे) हे दोघे गुरांना चारा आणण्यासाठी संध्याकाळी माळरानात गेले होते.

चारा घेऊन येताना रानटी जनावरांनी शेतीची नासधूस करू नये म्हणून जया गावकर हिने विद्युतभारित शेताभोवती विजेची तार घातली होती. रात्री उशिरा गावकर बंधू चारा घेऊन घराकडे येत असताना नकळत त्यांचा या तारेला स्पर्श झाल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.

रात्री उशिरापर्यंत दोघे भाऊ घरी परत न आल्याने गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असता, त्यांची रिक्षा माळरानावर दिसून आल्याने लोकांनी काही अंतरावर दूर जाऊन पाहिले असता दोघेही भाऊ निपचित पडल्याचे दिसून आले होते.

निष्काळजीपणा बेतला दोघांच्या जीवावर

या दुर्घटनेची माहिती स्थानिकांनी केपे पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तपासाला सुरुवात केली होती. निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी शिवसुरे येथील शेतमालक जया गावकर हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ खाली गुन्हा नोंद करून तिला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT