ऐन चतुर्थीत दुःखाचा डोंगर! गवत कापणीसाठी गेलेल्या भावांचा मृत्य, विजेच्या झटक्याने गमावला जीव

Rivona Goa Brothers Death: रिवोणा येथील पांडवसदा येथे दोन भावांचा विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यू झाला
rivona electricity accident
rivona electricity accidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: चतुर्थीच्या काळात राज्यात एक दुर्दैवी घटना घडली. गुरुवार (दि. २८) रोजी दोन भावांचा विजेच्या संपर्कात आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रिवोणा जिल्हा परिषदेचे सदस्य, सुरेश केपेकर यांनी या घटनेची माहिती दिली.

दोन भावांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.२८) पहाटे १२:४८ वाजता रिवोणा येथील पांडवसदा येथे दोन भावांचा विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यू झाला. केपे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतांची नावे राजेंद्र काशिनाथ गावकर (वय ४६) आणि मोहनदास काशिनाथ गावकर (वय ४०) अशी असून, दोघेही पांडवसदा, रिवोणा येथील रहिवासी होते.

rivona electricity accident
Goa Accident: अखेर 'त्या' निष्काळजी चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! स्टँड फोडून, अष्टमीच्या फेरीत घुसली बस

विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यू

प्राथमिक पोलीस तपासात असे समोर आले आहे की, दोघेही त्यांच्या गुरांसाठी गवत कापण्यासाठी गेले होते. गवत घेऊन परत येत असताना, शेतात वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेचा त्यांना स्पर्श झाला. या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय कायदेशीर प्रक्रियेसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एलपीएसआय जॉयसी कार्व्हालो करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com