Ponda by-election 2025 Dainik Gomantak
गोवा

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Ritesh Naik: काही कामे अपूर्ण राहिली आहेत, ती आता आम्ही पूर्णत्वाकडे नेत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकासाची वाटचाल करीत असल्याची ग्वाही नगरसेवक रितेश नाईक यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: दिवंगत आमदार तथा माझे वडील रवी नाईक यांनी केवळ फोंड्यातच नव्हे तर राज्यभर विकासाची कामे केली. त्यांच्या जाण्याने काही कामे अपूर्ण राहिली आहेत, ती आता आम्ही पूर्णत्वाकडे नेत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकासाची वाटचाल करीत असल्याची ग्वाही नगरसेवक रितेश नाईक यांनी दिली.

पांचमे, खांडेपार येथील तळ्याच्या बांधकामासह संवर्धन कामाचे बुधवारी उद्‍घाटन केल्यानंतर नाईक बोलत होते. यावेळी सरपंच नावेद तहसिलदार, उपसरपंच साजिदा सय्यद तसेच स्थानिक पंच मनीष नाईक, हरेश नाईक, अभिजित गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सरपंच नावेद तहसीलदार आणि पंच मनीष नाईक म्हणाले, रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंड्याचा विकास झाला.

आश्वासनांची पूर्तता!

रितेश म्हणाले की, पांचमे येथील हे काम दिवंगत रवी नाईक यांनी करून देण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्णत्वास आले आहे. जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यात येत असून आश्वासनांची पूर्तता होत असल्याने आनंद होत आहे. खडपाबांध येथे रवी नाईक यांचे कार्यालय खुले असून आम्ही विकासकामांचा पाठपुरावा करीत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

Toxic Movie Postponed: 'रॉकीभाई'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! बहुचर्चित 'टॉक्सिक' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर; 'हे' कारण आले समोर

SCROLL FOR NEXT