Goa Women Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! गोव्यातील गुन्हेगारी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग, वाचा माहिती

Goa Women Crime Report: यंदाचे हे गुन्‍हेगारी क्षेत्रातील वर्ष पुरुषांपेक्षा महिलांनीच अधिक गाजविले, असे म्‍हणावे लागेल. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा आणि काकाेडा बँक घोटाळा यामुळे गुन्‍हेगारी क्षेत्रातही महिला सक्रिय होत आहेत, ही बाब ठळकपणे पुढे आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Women Crime Report

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: २०२४ हे वर्ष संपता संपता जमीन बळकाव प्रकरणातील मास्‍टर माईंड सुलेमान खान ऊर्फ सिद्दीकी याने क्राईम ब्रँचच्‍या कोठडीतून पलायन केल्‍यामुळे आणि त्‍यासाठी एका पोलिस शिपयाचीच मदत घेतल्‍यामुळे गोवा ‍पोलिसांची इज्‍जत वेशीवर टांगली गेली असली तरी यंदाचे हे गुन्‍हेगारी क्षेत्रातील वर्ष पुरुषांपेक्षा महिलांनीच अधिक गाजविले, असे म्‍हणावे लागेल. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा आणि त्‍यानंतर पुढे आलेला काकाेडा बँक घोटाळा यामुळे गुन्‍हेगारी क्षेत्रातही गोव्‍यात आता महिला सक्रिय होत आहेत, ही बाब ठळकपणे पुढे आली.

राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांचा सिलसिला ऑक्‍टोबरच्‍या अखेरीस सुरू झाला. लोकांना सरकारी नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून फसविल्‍यामुळे २८ ऑक्‍टोबर रोजी पूजा नाईक व दीपश्री सावंत या दोन महिलांविरोधात गुन्‍हे नोंद झाले आणि त्‍यानंतर अशाप्रकारची एका पाठोपाठ अशी कित्‍येक प्रकरणे पुढे आली.

त्‍यात रेल्‍वेत नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून लोकांना लुटणारी प्रिया यादव, सरकारी नोकरी देते असे सांगून एका महिलेला लुटणारी सरिता केरकर, सार्वजनिक बांधकाम खात्‍यात नोकरी देते असे सांगून लोकांना लुटणारी श्रुती प्रभुगावकर, कारवारच्‍या सी-बर्डमध्‍ये नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून गोव्‍यातील बेरोजगार युवकांना लुटणाऱ्या सोनिया आचार्य आणि विषया गावडे त्‍यानंतर ‘आयएनएस हंसा’मध्‍ये नाेकरी देण्‍याचे आमिष दाखवून लोकांना लुटणारी उमा पाटील.

अशा अनेक ठकसेन महिलांची नावे पुढे आली. यातील काही महिला सत्ताधारी भाजपला जवळ असल्‍याने त्‍यांच्‍यामुळे भाजपची नाचक्‍की झाली. त्‍यापूर्वी जानेवारी महिन्‍यात विदिशा गावडे आणि विजयनाथ गावडे या दाम्पत्‍याने लोकांना स्‍वस्‍तात घरे मिळवून देण्‍याच्‍या बहाण्‍याने लाखो रुपयांना गंडविल्‍याचे प्रकरण ४ जानेवारी रोजी उघडकीस आले होते.

या घटनांमधून गोवा सावरत असतानाच नोव्‍हेंबर महिन्‍यात बँक मॅनेजर आनंद जाधव याला हाताशी धरून तन्‍वी वस्‍त या कुडचडे येथील महिलेने लोकांना गंडविण्‍याचे प्रकरण पुढे आले. तन्‍वी व आनंद यांनी किमान २० ते २५ जणांना दोन ते अडीच कोटी रुपयांची टाेपी घातल्‍याची घटना पुढे आली. याच दरम्‍यान, फातोर्डा येथील मायरन रॉड्रिग्स याने लोकांचे पैसे शेअर्समध्‍ये गुंतविण्‍याच्‍या बहाण्‍याने ११० कोटी रुपयांचा गफला उघडकीस आल्‍याने गोवा पुन्‍हा एकदा हादरला. याही प्रकरणात दोन महिलांचा हात होता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गोव्‍यात यंदा ३० खुनाची प्रकरणे उघडकीस आली असून त्‍यापैकी तीन प्रकरणांमध्‍ये महिलांचा हात असल्‍याचे दिसून आले आहे. त्‍यातील पहिले प्रकरण ९ जानेवारी रोजी उघडकीस आले. आपल्‍या नवऱ्याशी वितुष्‍ट असलेल्‍या सूचना शेट या बंगळुरूमधील एका एआय कंपनीत सीईओ असलेल्‍या महिलेने शिवोली येथे एका हॉटेलात उतरली असता आपल्‍याच मुलाचा खून करून त्‍याचा मृतदेह बॅगेत भरून नेण्‍याचा प्रकार केला.

४ फेब्रुवारी रोजी पिळर्ण येथे नरोत्तमसिंग धिल्‍लन या एनआरआय हॉटेल व्‍यावसायिकाचा खून झाला होता. हा खून करण्‍यातही खुन्‍याला एका महिलेचा सहभाग मिळाला होता. २४ मार्च राेजी बाणावली येथे विश्‍वनाथ सिदनाळ या टाइल्‍स फिटिंग करणाऱ्या कामगाराचा खून झाला होता. या प्रकरणात त्‍याच्‍याच पत्‍नीने आपल्‍या प्रियकराकरवी हा खून केल्‍याचे उघडकीस आले होते. गोव्‍यात जे ३० खून झाले आहेत त्‍यापैकी दहा खून महिलांचे झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT