DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

Goa Police: पोलिस अधीक्षकांनी पोलिस प्रमुखांची बैठक घेत राज्यात चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police

राज्यात चोरांनी मंदिरे, बंगले, फ्लॅट तसेच घरांना लक्ष्य बनवून धुमाकूळ घातल्याने पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली.

चोऱ्यांवर नियंत्रण आणा, रात्री पोलिस गस्तीत वाढ करा, तसेच गुप्तचर माहिती देणाऱ्या पोलिसांना सक्रिय करा, परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांची कसून चौकशी करा, अशा सूचना पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीवेळी अधीक्षकांना करण्यात आल्या.

ज्या प्रकरणामध्ये चोरांना गजाआड केले आहे, त्यांना इतर प्रकरणांमध्येही चौकशीसाठी बोलावून तपास करण्याच्या सूचना महासंचालकांनी केल्या. शेजारील राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याबाबतही सक्रिय व्हा, अशा कानपिचक्या अधीक्षकांना दिल्या.

या बैठकीनंतर संबंधित पोलिस अधीक्षकांनी पोलिस प्रमुखांची बैठक घेत राज्यात चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले.

नाकाबंदीत अपयश

या बैठकीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पोलिस अधीक्षकांनी, गेल्या चार महिन्यांत राज्यात झालेल्या चोरी प्रकरणांचा तसेच तपास पूर्ण केलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला.

चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच चोर गोव्याबाहेर पसार होत असल्याने राज्याच्या चेकनाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवूनही यश मिळत नाही, अशी हतबलता यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

SCROLL FOR NEXT