पणजी: उत्तर आणि दक्षिण गोव्यात (Goa Weather Updates) पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात अंदाजे 2 डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्यात एक-दोन ठिकाणी तुरळक पावसासह विजांचा कडकडाट होऊ शकतो. वारा ताशी 40 कि.मी. वेगाने वाहणार अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD Goa) वर्तविण्यात आली आहे. आज पणजी येथे कमाल 33.4 डिग्री सेल्सियस, तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आजच्या तापमानाची कालच्या तापमानाशी तुलना करता आजचे तापमान काही अंशी कमी होते. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी व उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कशासाठी... गारव्यासाठी...
राज्यात असह्य उकाडा होऊ लागल्याने अनेक नागरिक गारव्यासाठी नदी तसेच समुद्रकिनारी स्नान करत गारवा मिळविण्याचा पयत्न करीत आहेत. अनेक नागरिक, शहाळे, कोकम सरबत, कलिंगड, विविध फळांचे ज्युस, लस्सी, थंडपेये तसेच आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत.
काळजी घेणे जरूरीचे
राज्यातील वातावरणात सततचे होणारे बदल, वाढणारा उकाडा, मध्येच अचानक पडणारा पाऊस व धुके यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. राज्यातील तापमान 2 डिग्री सेल्सियसने वाढणार असल्याने नागरिकांनी उकाड्याच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ते उपाय करणे अत्यंत गरजेचे होणार आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना या उकाड्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्याच्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.