Deputy Chief Minister Babu Azgawkar Dainik Gomantak
गोवा

राज्यघटनेमुळेच बोलण्याचा अधिकार मिळाला: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्यामुळेच आणि घटनेमुळे आम्ही आमदार आणि उपमुख्यमंत्री झालो.

दैनिक गोमन्तक

स्वतंत्र लढ्यात ज्यांनी आहुती दिली, त्यांचे स्मरण करताना आम्हाला हा देश अबाधित राखायचे आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्यामुळेच आणि घटनेमुळे आम्ही आमदार आणि उपमुख्यमंत्री झालो, विधानसभेत बोलण्याचा अधिकार मिळाला तो या घटनेमुळेच आगामी काळात पेडणे मतदार संघ राज्यात अग्रस्थानी बनवायचे आहे. असे उद्गार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांनी सरकारी इमारतीसमोर पेडणे येथे ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. यावेळी पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, पेडणे उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर, मामलेदार अनंत मळीक, संयुक्त मामलेदार प्रिया कामत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास दावरे यांनी केले.

उपमुख्यमंत्री भडकले

ध्वजारोहण केल्यानंतर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे भाषण करायला उठले त्यावेळी, त्याना पेडणे नगराध्यक्ष नजरेला पडले, मात्र इतर ९ नगरसेवक उपस्थित नसल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांच्यावर भडकले , नगरसेवकाना आमंत्रण दिले नाही का असा सवाल केला , सर्वाना निमंत्रण द्यायला कळत नाही का असा सवाल उपस्थित केला.

माजी आमदार परशुराम कोटकर नाराज

पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांनी पत्रकारांकडे बोलताना राज्यात स्वंतत्र दिन, गोवा मुक्ती दिन असो सरकारी कार्यक्रमाचे निमंत्रण आम्हाला मिळते, मात्र पेडणे आणि पत्रादेवी येथे स्वतंत्र दिनाचे कार्यक्रम झाले, त्याचे साधे निमंत्रण मिळाले नाही, पेडणेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण मिळाले नसल्याने एक माजी आमदाराचा अपमान सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांची चौकशी मुख्यमंत्री आणि सचिवानी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

नगरसेवकांचा बहिष्कार

पेडणे शाशकीय पातळीवर झालेल्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण पेडणे पालिकेला दिले नाही, मात्र नगराध्यक्ष उषा नागवेकर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मात्र उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, माधव सिनाई देसाई, राखी कशालकर, तृप्ती सावळ देसाई, आश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, विष्णू साळगावकर व शिवराम तुकोजी या नऊ नगरसेवकांनी बहिष्कार घातला. नगरसेवक माधव सिनाई देसाई यांनीही आपल्याला निमंत्रण न मिळाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT