गौरव प्रसंगी मान्यवर आणि इतर Dainik Gomantak
गोवा

रिचा गोवेकर हिचा "पतंजली योग समिती- सांखळी" तर्फे गौरव..!

आजच्या मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण (Education) घेऊन आपले व पालकांचे नाव करणे असे उदगार शांताराम काणेकर यांनी काढले.

दैनिक गोमन्तक

साखळी: पतंजली (Patanjali) योग समिती सांखळीतर्फे रवींद्र भवन- सांखळी येथे अवघ्या 21 व्या वर्षी कमर्शियल (Commercial) पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सांखळी येथील कु.रिचा लवू गोवेकर हिचा गौरव करण्यात आला.

सांखळी येथील रिचाने वयाच्या केवळ 21 व्या वर्षी कमर्शियल विमान पायलट होण्याचा मान मिळविला. चिकाटी आणि अभ्यासात केलेल्या परिश्रमामुळे या पदापर्यंत मजल मारली. आजच्या मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन आपले व पालकांचे नाव करणे असे उदगार शांताराम काणेकर यांनी काढले.

यावेळी योगसेवा मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश बारजणकर, योग प्रशिक्षक योगसेवा समिती सांखळीचे अध्यक्ष शांताराम काणेकर, सम्राट क्लबचे कृष्णा गावस, रिचाचे वडील लवू गोवेकर, आई हेतल गोवेकर व योग साधक उपस्थित होते.शांताराम काणेकर यांच्याहस्ते रिचा हिचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

संदेश बारजणकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करून कु.रिचा हिस शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Goa Live News: महाराष्ट्रात MRF गोवा भरती; विजय यांनी केली भाजप सरकारवर टीका

Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT