Rice Farming Canva
गोवा

Bicholim Rain: डिचोलीत पुन्हा भातशेती आडवी! बळीराजाने टेकले हात; हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची भीती

Bicholim Rice Farming: मोसमी पाऊस माघार कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच रविवारी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला. परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने डिचोलीतील सर्वच भागात जोरदार तडाखा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Rice Farming Destroyed In Bicholim Due To Rain

डिचोली: मोसमी पाऊस माघार कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच रविवारी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला. परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने डिचोलीतील सर्वच भागात जोरदार तडाखा दिला. दरम्यान, जोरदार पावसामुळे डिचोलीतील बहुतेक भागातील भातपीक आडवे झाले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

पावसाचा कहर चालूच राहिल्यास भातपीक आडवे होऊन यंदा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची भीती बळीराजाला आहे. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे मयेसह बोर्डे आदी भागात भातशेती काही प्रमाणात आडवी झाली होती.

तरीदेखील शेतकऱ्यांना भातपीकाबाबत आशा वाटत होती. मात्र रविवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे कापणीसाठी तयार झालेली भातशेती पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पेरले आहे. पावसाचा कहर चालूच राहिल्यास भातपिकाची नासाडी अटळ आहे, अशी खंत मये येथील शेतकरी विश्वास चोडणकर आणि नागेश नाईक यांनी व्यक्त केली.

गडगडाटासह पर्जन्यवृष्टी

विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह रविवारी पावसाने जोरदार तडाखा दिला. साधारण तासभर जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित होतानाच विविध भागात वाहतुकीवरही परिणाम झाला. जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत झाडांची पडझड वा अन्य कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. डिचोली अग्निशमन दलाकडूनही या वृत्तास दुजोरा मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT