Goa ZP Election: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. भाजपविरोधात एक मजबूत मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधी पक्षांमध्ये आता रिव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षाने आम आदमी पक्षासोबतही युती करण्याची तयारी दर्शवली. 'आरजीपी'चे अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केले.
परब यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांसारख्या पक्षांसोबत सुरु असलेल्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर 'आप'ला युतीसाठी दरवाजे खुले ठेवले. परब म्हणाले, "गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेसबरोबर आम्ही युती करु, असा विचार आम्ही कधीही केला नव्हता, पण तसे घडले." या विधानाद्वारे त्यांनी भाजपला हरवण्यासाठी 'आरजीपी' वैचारिक मतभेद बाजूला ठेवू शकते, हे स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, "सध्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व शक्यता खुल्या आहेत." 'आप'सोबत युती करण्याची तयारी दर्शवताना परब म्हणाले, "जर 'आप'ने युतीबाबत आपला निर्णय बदलला आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, तर आम्ही निश्चितच पक्षांतर्गत चर्चा करुन यावर योग्य निर्णय घेऊ."
'आरजीपी' सध्या काँग्रेस आणि विजय सरदेसाईंच्या नेतृत्वाखालील 'गोवा फॉरवर्ड' सोबत जागावाटपावरुन चर्चा करत आहे, परंतु काही जागांवर तिढा कायम आहे. अशा परिस्थितीत, 'आरजीपी'ने थेट 'आप'ला दिलेला हा युतीचा प्रस्ताव गोव्याच्या (Goa) राजकारणात नवीन वळण देणारा ठरु शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, या भूमिकेवर 'आरजीपी' ठाम असल्याचे यातून स्पष्ट होते. जर 'आप'ने या प्रस्तावाला प्रतिसाद दिला, तर जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी एक मोठी आघाडी तयार होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.