Manoj Parab Press Conference Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Manoj Parab Press Conference: गेल्या काही दिवसांपासून आमदार वीरेश बोरकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सोशल मीडियाद्वारे आरोप करणारे रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी सोमवारी सौम्य भूमिका घेतली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गेल्या काही दिवसांपासून आमदार वीरेश बोरकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सोशल मीडियाद्वारे आरोप करणारे रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी सोमवारी सौम्य भूमिका घेतली. बोरकर यांनी स्वतः वेळ निश्चित करून केंद्रीय कार्यकारिणीच्या (सीईसी) बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले की, आमदार वीरेश बोरकर यांना सोमवारी चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, गोव्याबाहेर असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी ई-मेलद्वारे कळविले. 'राजकीय आणि घड्याळातील वेळ वेगवेगळी' असे बोरकर यांनी मेलमध्ये नमूद केले आहे. त्यावर उत्तर देताना, 'त्यांनीच वेळ ठरवून चर्चेला यावे असे आम्ही त्यांना कळविले आहे' असे परब यांनी सांगितले.

पक्षातील अंतर्गत वाद लवकर संपणे गरजेचे असल्याचे सांगताना परब म्हणाले, 'आरजी' हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही. पक्षापेक्षा कुणीही मोठे नाही. आमदार बोरकर यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय पुढील निर्णय वीरेशचे इंग्रजीतील उत्तर खूप अवघड वरिश बोरकर यांनी इंग्रजीतून दिलेले उत्तर खूपच अवघड आहे. त्यांची इंग्रजी आता फार सुधारली असून जागतिक पातळीवर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच बोरकर पुढील काळात पक्षात असले किंवा नसले तरी त्यांच्याबाबतचे प्रेम कायम राहील, असेही मनोज परब यांनी स्पष्ट केले.

घेता येणार नाही. त्यांना केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला यायचे नसेल, तर त्यांनी माझ्यासह सरचिटणीस विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा करून आपली भूमिका मांडावी.परब यांनी सांगितले की, पक्षातील वाद चर्चेतून मिटला असता तर तो फेसबुकपर्यंत पोहोचला नसता. कार्यकर्ते दुखावले आहेत. सर्वांनी चुका सुधारून पक्षाला पुढे नेणे आवश्यक आहे, असेही परब यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT