Goa Politics: 'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला 'ईडी'कडून अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीसह गोव्यात झडती, अनेक आरोप

AAP Goa Co Incharge Deepak Singla Arrest: बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)आम आदमी पक्षाचे गोवा सहप्रभारी दीपक सिंगला यांना सोमवारी दिल्लीत अटक केली.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)आम आदमी पक्षाचे गोवा सहप्रभारी दीपक सिंगला यांना सोमवारी दिल्लीत अटक केली. दीपक सिंगला अटकेपूर्वी भाजपवर गंभीर आरोप. 'ईडी'ने त्यांची आतिशी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही कारवाई केवळ आमच्या कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी नसून पक्षाचा संघटनात्मक डेटा मिळवण्याचाही प्रयत्न आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वीही झडती

दीपक सिंगला हे यापूर्वीही 'ईडी'च्या रडारवर आले होते. २०२४ मध्ये कथित बँक फसवणूक आणि मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान 'ईडी'ने त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली होती.'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला ईडीकडून अटके

Goa Politics
Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

अनेक तास चौकशी केली.

या प्रकरणी दिल्लीसह गोव्यातील विविध ठिकाणी 'ईडी'ने झडती मोहीम राबवली. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाने (झोन-२) सिंगला यांना ताब्यात घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी २०२४ मध्येही याच प्रकरणात सिंगला यांच्या निवासस्थानी झडती बेण्यात आली होती. गोवा दरम्यान, 'आप'च्या प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मंत्री आतिशी मालेंना यांनी 'एक्स'वर पोस्ट करत गोव्यातील पक्षाच्या काही स्वयंसेवकांच्या घरांवरही छापे टाकल्याचा दावा केला.

निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'आप'चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनीही ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका केली. ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांचा वापर विरोधकांना रोखण्यासाठी केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bharti Pawar Goa in Charge
Goa election 2027 AAP Congress
Goa First Alliance Formation
Goa First Alliance 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com