Goa
Goa  Dainik gomantak
गोवा

विदेशातील भूमिपुत्रांमुळेच ‘आरजी’च्या मतांत वाढ?

दैनिक गोमन्तक

मडगाव : राज्याच्या राजकारणात काँग्रेस, भाजप, मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी हे पक्ष विधानसभा 2022 च्या निवडणूकीच्या रणागंणात होते. ज्यात भाजपने बाजी मारत 20 जागा आपल्या ताब्यात घेतल्या. तर 40 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. तर आम आदमी पार्टीला 2 जागा मिळाल्या. अशा जागा निवडूण येत असताना सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आली आणि ज्यामुळे गोव्याच्या राजकारणार खळबळ माजली. ती म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) ची. (RG votes increase due to Goan people living abroad)

या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) रिव्होल्युशनरी गोवन्सला (आरजी) कोणीच गांभीर्याने घेतले नव्हते. पण त्या पक्षाच्या उमेदवारांनी विविध मतदरसंघांत (Constituencies) घेतलेली मते व सांत आंद्रेमधून निवडून आलेला उमेदवार (Candidate) पाहून सर्वांचेच डोळे विस्‍फारले आहेत. काही ठिकाणी आरजीच्‍या मतांमुळेच अनेकांना पराभव पत्करावा लागलेला आहे. मात्र अनेकांना आरजीला मते मिळाली कशी आणि कोणाची असाच प्रश्न पडला आहे.

तसेच मतमोजणीनंतर (Counting) अनेकांनी हे कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला, पण नेमके उत्तर अजून मिळालेले नाही. कोणतेही आंदोलन (Movement) हाती घेताना या संघटनेचे कार्यकर्ते ‘उजो...उजो’ अशा घोषणा देऊन गोंधळ घालतं. पण कोणीच त्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. आता मात्र या संघटनेने गोव्यात खरोखरच ‘उजो’ घातल्याची प्रतिक्रिया अनेकांची व्‍यक्त केली आहे.

पूर्वी विदेशात विशेषतः आखाती देशांत (Gulf Countries) कामाला असलेले येथील युवक या संघटनेला पैसे पाठवतात असे म्हटले जात होते. पण आता अनेकांना त्यात तथ्य वाटू लागले आहे. समाजमाध्यमांमुळे (Social Media) ही मंडळी व आखाती देशांत असलेल्या गोवेकर तरुणांची जवळीक वाढली. त्यानंतर विविध प्रश्र्नांवर चर्चा होऊन ही संघटना जन्मली. त्यातूनच ती निवडणुकीत उतरली. मिळत असलेल्या माहितीवरून या निवडणुकीत (Election) चर्च संघटनेने स्पष्ट भूमिका घेतली होती. पण तिचा आरजीला पाठिंबा नव्हता.

एरवी गोव्यातील (Goa) राजकारणात चर्च महत्वाची भूमिका बजावते व ती सांगते तसे तिचे अनुयायी वागतात. पण यावेळी प्रथमच अनुयायांनी चर्चचा संदेश पाळला नाही. तर विदेशात व आखाती देशांतील आपल्या मुलांचे म्हणणे ऐकून आरजीला (RG) मतदान (Vote) केले असा कयास या अनुयायांवर विसंबून असलेले राजकारणीच व्‍यक्त करू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT