Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भविष्‍यात बोरकर यांना पूर्णपणे उघडे पाडू, पक्ष कधीही त्‍यांच्‍या ताब्‍यात देणार नाही; विश्‍‍वेश नाईकांची टीका VIDEO

Vishwesh Naik, Viresh Borkar: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) विश्‍‍वेश नाईक-अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर या दोन गटांतील वाद आता आणखी चिघळला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) विश्‍‍वेश नाईक-अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर या दोन गटांतील वाद आता आणखी चिघळला आहे. सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक यांनी बोरकर यांना थेट ‘गद्दार’ आणि ‘चोर’ म्‍हटले आहे. तसेच भविष्‍यात बोरकर यांना पूर्णपणे उघडे पाडू आणि पक्ष कधीही त्‍यांच्‍या ताब्‍यात देणार नाही, असा इशाराही दिला आहे. सांतआंद्रेत गाजत असलेला बंगला कोणाचा? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

सोशल मीडियाद्वारे पक्षाच्‍या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विश्‍‍वेश नाईक म्‍हणाले, आमदार वीरेश बोरकर यांनी आम्‍हाला पक्षाच्‍या व्‍हॉट्स-अॅप ग्रुपमधून काढून त्‍याचा ताबा पूर्णपणे आदित्‍य देसाई यांच्‍याकडे दिला आहे. शिवाय पक्षाचा मेल, फेसबुक खाते, यु–ट्यूब चॅनल त्‍यांनी हॅक केले आहे. केवळ स्‍वत:च्‍या राजकीय स्‍वार्थासाठी बोरकर हे सर्व करत आहेत. ते आमदार व्‍हावेत यासाठी आम्‍ही सर्वांनी रात्रंदिवस काम केले.

आमदार झाल्‍यानंतर माजी अध्‍यक्ष मनोज परब आणि खजिनदार अजय खोलकर या दोघांनी त्‍यांना विधानसभा

पक्षाची चोरी करू देणार नाही

आमदार वीरेश बोरकर चोर असल्‍याचे पूर्णपणे सिद्ध झालेले आहे. परंतु ते पक्ष चोरू शकत नाहीत. योग्‍य पद्धतीने पक्षही त्‍यांच्‍या ताब्‍यात देण्‍यास आम्‍ही तयार होतो. पण, त्‍यांना ते मान्‍य नव्‍हते. या सर्व घडामोडींमागे कोण आहेत, तेही आम्‍हाला माहीत आहे. परंतु, काही झाले तरी आम्‍ही पक्ष त्‍यांच्‍या ताब्‍यात जाऊ देणार नाही, असे विश्‍‍वेश नाईक यांनी म्‍हटले आहे.

कामकाजाचे धडे दिले. तेथे कसे बोलायचे हे शिकवले. तरीही वीरेश केवळ स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी हे सगळे विसरले. आम्‍हाला सोशल मीडियावरून काढून त्‍यांनी मोठी गद्दारी केली आहे.पक्ष शिस्‍तीचा भंग केल्‍यामुळे ज्‍यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले, ते निर्णय घेताना संस्‍थापक सदस्‍य तसेच केंद्रीय कार्यकारिणीचे (सीईसी) सदस्‍य या नात्‍याने आमदार बोरकरही त्‍यावेळी उपस्‍थित होते. या कारवाया करताना ते नेहमी शांत असायचे.

परंतु, तेच स्‍वार्थी लोक आज वीरेश यांच्‍यासोबत आहेत, असा आरोप विश्‍‍वेश नाईक यांनी केला. नगरनियोजन कायद्याच्‍या कलम ‘३९-अ’चा मुद्दा घेऊन राज्‍यभर फिरण्‍याचा सल्ला आम्‍हीच बोरकर यांना दिला होता. परंतु, ते दक्षिण गोव्‍यात फिरकले नाहीत. त्‍यानंतर मडगावात बैठक घेऊन त्‍यांनी पक्षविरोधी कारवाया सुरू केल्‍या.

त्‍यांच्‍या विश्‍‍वासातील काही जणांनी पणजीत पत्रकार परिषद घेत आम्‍ही पक्ष बंद करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचा खोटा दावा केला. परंतु, त्‍यात काहीही तथ्‍य नव्‍हते. मुळात पक्षात फूट पाडण्‍याचा प्रयत्‍न बोरकर गेल्‍या काही महिन्‍यांपासून करीत होते. परंतु, ‘दात आणि ओठही आपले’ असल्‍याने आम्‍ही गप्‍प होतो. त्‍यांच्‍या वागण्‍याकडे आम्‍ही दुर्लक्ष केले.

तीच आमची चूक झाली, असे नाईक म्‍हणाले. ‘आरजी’मध्‍ये अशा पातळीचे अंतर्गत राजकारण होईल, असे आम्‍हाला कधीच वाटले नव्‍हते. परंतु, विधानसभा निवडणूक काहीच महिन्‍यांवर येऊन ठेपली असताना आमदार वीरेश बोरकर यांनी ते करून दाखवले. त्‍यांच्‍याकडून असे प्रकार होतच राहिल्‍यास आम्‍ही त्‍यांना पूर्णपणे उघडे पाडू. त्‍यांच्‍या चुका यापुढे खपवून घेतल्‍या जाणार नाहीत, असा इशाराही विश्‍‍वेश नाईक यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT