ISL Goa Football Team: 'FC Goa'चा डिफेन्स आणखी मजबूत! रुद्र वेद मुला, सावेमे तारियांगची संघात एन्ट्री, प्रतिस्पर्ध्यांना मिळणार कडवं आव्हान

FC Goa 2026 27 Season: एफसी गोवा संघाने आगामी २०२६-२७ मोसमासाठी बचावफळीत नव्या फुटबॉलपटूंना सामावून घेतले आहे.
FC Goa new signings latest updates
FC Goa new signings latest updatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवा संघाने आगामी २०२६-२७ मोसमासाठी बचावफळीत नव्या फुटबॉलपटूंना सामावून घेतले आहे. रुद्र वेद मुला व सावेमे तारियांग यांना करारबद्ध केल्याची माहिती क्लबने रविवारी दिली.

रुद्र हा सेंटर-बॅक, तर सावेमे लेफ्ट-बॅक जागी खेळतो. या दोघांविषयी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी या दोन्ही खेळाडूंशी केलेल्या करारबद्दल आनंद व्यक्त केला. दोघेही तरुण व मेहनती असून त्यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे, तसेच प्रगती साधण्याची कौतुकास्पद वृत्ती आहे.

FC Goa new signings latest updates
Goa Accident: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! 5 वर्षांत 4,657 अपघातांत 1,011 जणांचा मृत्यू; सर्वाधिक बळी 45 ते 60 वयोगटातील

दोघांतही शिकण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांच्या विकासासाठी आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एफसी गोवा संघ आदर्शवत आहे. ते नक्कीच सकारात्मक योगदान देतील याची आम्हाला खात्री आहे.

FC Goa new signings latest updates
Goa Forest Rights Claims: राज्‍यातील 30 टक्‍केच वन हक्‍क दावे निकाली, 1,901 दावे फेटाळले; 1,270 जणांना सनदांचे वितरण

एफसी गोवाशी करारबद्ध होण्यापूर्वी रुद्र व सावेमे यांनी गतमोसमात इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेत मेघालयातील शिलाँग लाजाँग एफसीचे प्रतिनिधित्व केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com