Pakistan Blast: पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट! स्वातमधील शांतता रॅलीत आत्मघाती हल्ला; 14 नागरिकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Pakistan Peace Rally Blast: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.
Pakistan Peace Rally Blast
Pakistan BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Peace Rally Blast: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. रविवारी (2 ऑगस्ट) स्वात जिल्ह्यातील कबाल शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका शांतता रॅलीदरम्यान अचानक झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटामुळे मोठा हाहाकार उडाला. या दुर्दैवी घटनेत तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले.

स्थानिक पोलीस आणि खैबर पख्तूनख्वा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट स्वात अमन जिरगा म्हणजेच स्थानिक आदिवासी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'स्वात शांतता रॅली' दरम्यान झाला. या रॅलीचा मुख्य उद्देश परिसरात वाढत्या हिंसेविरुद्ध शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करणे हा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक आत्मघाती हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे, तरीही या संदर्भात अधिकृत तपास यंत्रणांकडून अधिक तपास सुरु आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी अजून तरी कोणत्याही दहशतवादी (Terrorist) संघटनेने घेतलेली नाही.

Pakistan Peace Rally Blast
Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

स्फोटाची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम वेगाने सुरु केली. खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत गंभीर बनला. याआधीही अवघ्या एका आठवड्यापूर्वी, म्हणजे 26 जुलै रोजी बाजौर जिल्ह्यातील सलारजई तहसीलजवळ झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.

Pakistan Peace Rally Blast
Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

उत्तर-पश्चिम पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा प्रांत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उग्रवादी हिंसाचार आणि अशांततेचा सामना करत आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या भागात दहशतवाद्यांची सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि पाकिस्तानी सैन्यासोबतचे सततचे संघर्ष हे सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरले आहे. याशिवाय, ड्युरंड लाईन मानण्यास नकार देणारे स्थानिक गट आणि उग्रवादी संघटनांमुळे या भागात सातत्याने अशा रक्ताळलेल्या घटना घडत असून सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com