Goa Su-Raj Party  Dainik gomantak
गोवा

‘आरजी’ने आमचा विश्वासघात केला; गोवा सुराज पार्टी

त्यामुळे आम्ही या पक्षाशी फारकत घेतली असल्याचे वाझ यांनी सांगितले

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली असतानाही त्यांनी आमच्यापासून ही त्यांनी माहिती लपवून ठेवली आणि आमचा विश्वासघात केला, असा आरोप गोवा सुराज पार्टीचे (Goa Su-Raj Party) अध्यक्ष इनासियो वाझ यांनी मडगावात पत्रकार परिषदेत करून आपल्या पक्षाचे ‘आरजी’शी संबंध तुटल्याचे जाहीर केले.

‘आरजी’ची निवडणूक आयोगाकडे 30 नोव्हेंबर रोजी नोंदणी झाली. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी या पक्षाला फुटबॉल हे चिन्ह देण्यात आले. याविषयीची माहिती ‘आरजी’ने आमच्यापासून लपवून ठेवून आम्हाला झुलवत ठेवले आणि नोंदणी करण्याचे काम सुरू असल्याची खोटी माहिती पुरविली. त्यामुळे आम्ही या पक्षाशी फारकत घेतली असल्याचे वाझ यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत गोवा (goa) सुराज पार्टीचे संस्थापक फ्लोरियान लोबो, झरिना डिकुन्हा उपस्थित होत्या.

फ्लोरियान लोबो म्हणाले, मनोज परब (Manoj Parab) यांनी पत्रकार परिषदेत गोवा सुराज पार्टीने आम्हाला सर्व अधिकार दिले असल्याचे खोटे सांगितले. मात्र, मी तुला निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) चिन्ह दिले असेल तर तू पुढे जा, असे सांगितले होते. याबरोबरच ‘आरजी’चे नोंदणीकरण केव्हा झाले आणि चिन्ह कधी दिले याचा पुरावा दे, असे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT