Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

विश्वजीत राणेंना महत्त्वाच्या खात्यांची बक्षिसी

जल्लोष: आरोग्य, महिला-बाल विकाससह वन, नगरनियोजन, नगरविकास खाते

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपईचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री विश्वजीत प्रतापसिंह राणे यांना महत्त्वाची पाच खाती बहाल केल्याने सत्तरी तालुक्यात जल्लोषाचे वातावरण असून लोक आनंदी झाले आहेत. विश्वजीतना मागीलवेळी आरोग्य, महिला आणि बाल विकास ही खाती दिली होती. यावेळी त्यात वाढ करीत वन खाते, नगरनियोजन, नगरविकास ही आणखी तीन अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत. विश्‍वजीत यांच्या या प्रगतीच्या चढत्या आलेखाविषयी वाळपईच्या नगराध्यक्ष शेहझीन शेख म्हणाल्या, मंत्री विश्वजीत यांनी मागील पाच वर्षांत आरोग्य खात्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आरोग्य सेवेची जबाबदारी दिल्याने त्यांचे अभिनंदन आहे. त्यात आता त्यांना आणखी तीन अतिरिक्त खाती दिली आहेत.

त्यामुळे सत्तरीच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विशेष करून वाळपई पालिका क्षेत्रातील कामांना आणखी गती मिळणार आहे. वाळपईचे नगरसेवक रामदास शिरोडकर म्हणाले, विश्वजीत यांनी वाळपईचा कायापालट केला आहे. प्रत्येक प्रभागात विकासकामांना चालना दिली होती. आता पाच महत्त्वाची खाती मिळाल्याने वाळपईसह सत्तरीचा विकासरथ आणखी गतिमान होणार आहे.नगरगावचे पंच रामू खरवत म्हणाले, राणेंच्या मंत्रिपदामुळे विविध भागांत विशेष करून दुर्गम भागांत सोयीसुविधा पोहचल्या आहेत. नगरगाव पंचायत क्षेत्रात हॉटमिक्स रस्ते झाले आहेत. येत्या पाच वर्षांत आता सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यास मोठा वाव मिळाला आहे.

वाळपईचे माजी नगराध्यक्ष अख्तर शहा म्हणाले, राणे यांनी कोविड महामारीवेळी मोठा संघर्षमय काळ पाहिला. त्या मोठ्या संकटातही राणे यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत कोविड नियंत्रणात आणला. आता पुन्हा आरोग्य खात्याबरोबरच अन्य खात्यांचीही जबाबदारी ते सक्षमपणे पेलणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT