Revolutionary Govans Party held meeting to announce party registration In Goa
Revolutionary Govans Party held meeting to announce party registration In Goa  Dainik Gomantak
गोवा

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने भर पावसात गाजवली सभा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa Election) अचानक हजेरी लावलेल्या पावसातही रिव्होल्युशनरी गोवन्स (Revolutionary Goans) पार्टीने पक्ष नोंदणी घोषणेची सभा गाजवली. विशेष म्हणजे आरजीचे (RG) सर्व नेते यावेळी भावूक झाले होते. हजारो लोक अक्षरशः पावसात डोकीवर खुर्च्या घेऊन आझाद मैदानावरील सभेस उपस्थित होते. त्याशिवाय ते त्याही स्थितीत ‘उजो’च्या घोषणा देत होते. त्यात अबालवृद्धांचा समावेश होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आम्ही जिंकलो आहोत, या आरजीचे अध्यक्ष मनोज परब (manoj parab) यांच्या वक्तव्याची प्रचिती रविवारच्या सभेत आली.

यावेळी आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आम्ही गोवा सुराज्य पक्षाद्वारे येती विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून येत्या आठवड्याभरात उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली. काल रात्री उशिरा 9.45 वाजेपर्यंत ही सभा सुरू होती. चार वर्षे आठ महिन्यांपूर्वी आरजीची स्थापना झाली. गोवा हा गोवेकरांसाठीच असेल, त्याच उद्देशाने आम्ही पक्षाची नोंदणी करून घेतली आहे.

लोकांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या

आम्हाला त्यावेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, पण आम्ही मागे हटलो नाही. यापुढेही आम्ही त्याच ऊर्जेने कार्यरत राहू, असे सभेच्या सुरवातीलाच विश्वेश नाईक यांनी सांगितले. सभेचे जंगी आयोजन करण्यात आले होते. आझाद मैदानाचे तीन प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. कारण या सभेला शेवटपर्यंत पोलिस खात्याने परवानगी दिली नव्‍हती. त्यानंतर काही अटींसह परवानगी दिली. तरीही आझाद मैदानावर हजारोंचा जमाव स्वयंप्ररणेने जमा झाला होता. त्यात अबालवृद्धांचा समावेश होता. पाच वाजता सुरू होणारी सभा 6 वाजता सुरू झाली. विश्‍वेश नाईक यांनी जणू उपस्थितांना स्तब्ध केले. त्यांनी गेल्या चार वर्षांचा आरजीचा आढावा घेतला. नोकरी सोडावी लागली तरी आम्ही गोवेकरांच्या हक्कासाठी झटत राहिलो अशी भावनिक साद त्यांनी घातली. सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही लोक जागचे हलले नाहीत.

15 उमेदवार निश्चित

आमचे 15 उमेदवार निश्‍चित झाले आहेत. मात्र, केवळ पक्षाची नोंदणी न झाल्याने त्यांची घोषणा झाली नव्हती. आता पक्षाची नोंदणी झाली असल्याने प्रत्यक्ष राजकारणाला सुरवात होईल. 2022 च्या निवडणुकीत गोवेकर लाचारी सोडून स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू करील याबाबत आम्हाला खात्री आहे, असे मनोज परब म्हणाले.

‘40 आमदार हे दलाल’

सभेत भाषण करताना आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्याकडे आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया, तृणमूलचे प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ क्लीप असून त्या सादर करू अशी घोषणा आज केली. राज्यातील 40 आमदार हे दलाल आहेत. त्यांना परप्रांतीयांचे सहकार्य लाभत आहे, असा आरोप परब यांनी केला.

गोवा सुराज्य पार्टीचा पाठिंबा

सभेत गोवा सुराज्य पार्टीचे इनासिओ वाझ यांनी मशाल पेटवून आरजीच्या राजकीय पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांनी राज्यात गोवेकरांच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे मत मांडले. प्रसंगी विरेश बोरकर म्हणाले, आम्ही पैसेवाले नाही, पण आम्हाला सर्वसामान्य लोक देणगी देतात, त्यावरच आम्ही समाजसेवेचे व्रत घेतले आहे.

विरोधकांना धडकी

एकंदर, काल रविवारी धो-धो पावसातही आरजीच्या समर्थकांनी दाखविलेले समर्थन विरोधकांना धडकी भरविणारे होते. त्याशिवाय आरजीच्या नेत्यांनी विरोधक आप, तृणमूल आणि कॉंग्रेसवर केलेल्या गंभीर आरोपांना हे पक्ष उत्तर देणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यावेळी विश्‍वेश नाईक, श्रीकृष्ण परब, इनासिया वाझ, फ्लोरीयन लोबो, आदित्य देसाई, रोहन कळंगुटकर, ॲड. सुनैना गावडे उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT