Revolutionary Goans | Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : आरजी लढवणार लोकसभेच्या दोन्हीही जागा; मनोज परब यांची माहिती

भाजप आणि काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी एक लोकसभेच्या जागा आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election : येत्या 2024 लोकसभेच्या राज्यातील दोन्हीही जागा रेव्होलशनरी गोवन लढेल, अशी माहिती आरजीचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी दिली आहे. गोवा वेल्हा येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली.

राज्यात दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा अशा दोन लोकसभेच्या जागा असून भाजप आणि काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे.

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी यावेळी सांगितले की, विधानसभा निवडणुकीमध्ये आरजी पक्षाला मोठ्या प्रमाणात लोकांचे समर्थन मिळाले आहे. अनेक ठिकाणी आरजी पक्षाच्या उमेदवारांनी चांगली मते घेतलेली आहेत. काही ठिकाणी तर दुसऱ्या क्रमांकावर आमचा पक्ष होता. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पक्ष दोन्ही जागी आपले उमेदवार उभे करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या नावे पक्ष घोषित करणार असल्याचे परब यांनी सांगितले.

सध्या गोव्यामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, त्यामुळे आरजी विरोधी पक्षाचे काम करत आहे. लोकांच्या आग्रहाखातर आम्ही दोन्ही जागा लढवणार आहोत, अशी माहिती आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी दिली.

येत्या काळात आरजी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत असून येत्या लोकसभा निवडणूकीत आम्ही दोन्ही उमेदवार उभे करून जनमत चाचणी करणार आहोत असे यावेळी बोरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT