Viresh Borkar Revolutionary Goans  Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : ...म्हणून विधानसभेत तटस्थ राहिलो; वीरेश बोरकरांनी सांगितलं कारण

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सने यूपीएच्याच बाजूने मतदान केलं. मात्र उपसभापतीपदाच्या निवडणुकीत आपण तटस्थ राहिलो, असं वीरेश यांनी स्पष्ट केलं आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोवा विधानसभेत उपसभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसुझा आणि शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्यात थेट लढत झाली. 24 मतं मिळवणाऱ्या ज्योशुआ यांची उपसभापती निवड झाली आहे, तर डिलायला यांना 12 मतं मिळाली आहेत. आप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार या निवडणुकीवेळी तटस्थ राहिले. आता सांत आंद्रेचे आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सने यूपीएच्याच बाजूने मतदान केल्याचं वीरेश बोरकर यांनी स्पष्ट केलं. मात्र उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र आपण तटस्थ राहिलो, असं वीरेश यांनी स्पष्ट केलं आहे. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या आमदारांवर आमचा विश्वास राहिला नाही. ते भाजपच्या वाटेवर आहेत हे सर्वांना माहित आहे. आज आम्ही डिलायलांच्या बाजूने मतदान केलं असतं आणि उद्या त्या भाजपमध्ये गेल्या असत्या तर आम्ही लोकांना काय उत्तर देणार होतो असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदारांकडूनच क्रॉस वोटिंग झाल्याचा दावा आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी केला आहे. तसंच काँग्रेसकडून झालेलं क्रॉस वोटिंग प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनाही माहित आहे. मात्र आता ते घुमजाव करत असल्याचा दावाही वीरेश बोरकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT