Revolutionary Goans Party merger Dainik gomantak
गोवा

Revolutionary Goans Party merger: वीरेशची खेळी पक्ष विलीन करण्‍यासाठीच!आरजीचे निलंबित खजिनदार अजय खोलकर यांचा दावा

Veires Borkar national president: आमदार वीरेश बोरकर यांना रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजी) पक्ष इतर पक्षात विलिन करायचा आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आमदार वीरेश बोरकर यांना रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजी) पक्ष इतर पक्षात विलिन करायचा आहे. त्‍यामुळेच आपण राष्‍ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणत त्‍यांनी आपले निलंबन केले आहे’’, असा दावा निलंबित खजिनदार अजय खोलकर यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना केला.

आरजीपी पक्षाच्‍या नोंदणीपूर्वी वीरेश बोरकर अध्‍यक्ष होते. ‘आरजीपी’ला राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी आम्‍ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केल्‍यानंतर आयोगाने त्‍यात त्रुटी काढल्‍या आणि आमचा पक्ष केवळ गोव्‍यापुरता मर्यादित असल्‍याने राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा देता येत असल्‍याचे सांगितले.

शिवाय आयोगाने आम्‍हाला २१ जणांची कोअर कमिटी स्‍थापन करण्‍यासही सांगितले होते. त्‍यानुसार, आमदार बोरकर यांच्‍या सल्ल्‍यानुसार पक्षाच्‍या संविधानात दुरुस्‍ती करून २१ जणांची कोअर समिती स्‍थापन करण्‍यात आली. २०२२ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत वीरेश बोरकर जिंकून आल्‍यानंतर त्‍यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी राहण्‍यास नकार दिला.

त्‍यामुळे पक्षांतर्गत निवडणूक होऊन मनोज परब पक्षाचे अध्‍यक्ष झाले. त्‍यामुळे वीरेश बोरकर हे पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नसल्‍याने त्‍यांना आम्‍हाला निलंबित करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. आमदार बोरकर कोअर समितीचे सदस्‍य होते. त्‍यामुळे आम्‍हीच त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याचा विचार करीत आहोत’’, असे खोलकर म्‍हणाले.

दरम्‍यान, आमदार वीरेश बोरकर यांच्‍या गटाची काही महिन्‍यांपूर्वी मडगावात जी बैठक झालेली होती, त्‍यात आरजीपी इतर पक्षांत विलिन करण्‍याबाबतही चर्चा झालेली होती. त्‍यामुळेच आमदार बोरकर आरजीपी स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेऊन तो इतर पक्षांमध्‍ये विलिन करण्‍याच्‍या प्रयत्‍नांत आहेत’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

म्हणून मनोज परब झाले अध्यक्ष

२०२२ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत वीरेश बोरकर जिंकून आल्‍यानंतर त्‍यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी राहण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे पक्षांतर्गत निवडणूक होऊन मनोज परब पक्षाचे अध्‍यक्ष झाले, असे अजय खोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT