mla viresh borkar Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans Party Dispute: 'आरजी'त उडाला राजकीय भडका! पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत 10 बड्या पदाधिकाऱ्यांचे थेट निलंबन; वीरेश बोरकर गट आक्रमक

RG Party Suspends 10 Members: केंद्रीय कार्यकारिणीत (सीईसी) झालेल्‍या वाटाघाटी अपूर्णावस्‍थेत असतानाच पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका ठेवत पक्षाने दहा पदाधिकाऱ्यांना मंगळवारी निलंबित केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर आणि पक्षाच्‍या केंद्रीय कार्यकारिणीत (सीईसी) झालेल्‍या वाटाघाटी अपूर्णावस्‍थेत असतानाच पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका ठेवत पक्षाने दहा पदाधिकाऱ्यांना मंगळवारी निलंबित केले. त्‍यातील सहाजण गत विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’चे उमेदवार होते.

मनोज परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदासह संस्‍थापक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिल्‍यानंतर आता ‘आरजी’त आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर-विश्‍‍वेश नाईक असे दोन गट पडले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार बोरकर यांनी ‘सीईसी’समोर उपस्‍थित राहून आपले सर्व प्रश्‍‍न मांडले होते. त्‍यावेळी झालेल्‍या बैठकीत अजय खोलकर आणि बोरकर यांच्‍यात शाब्‍दिक द्वंद्व रंगल्‍याचे व्‍हिडिओही गोमंतकीयांनी पाहिले होते. परंतु, बोरकर यांनी सामंजस्‍याने वाद वाढू दिला नव्‍हता. त्‍यानंतरच्‍या काळातही आमदार बोरकर, पुढील विधानसभा निवडणूक (Election) ‘आरजी’कडूनच लढवणार असल्‍याचे स्‍पष्‍टपणे सांगत असतानाही आता पक्षाने त्‍यांच्‍या मर्जीतील दहाजणांना निलंबित केल्‍याने बोरकर आणि खोलकर-नाईक या दोन गटांतील वाद पुन्‍हा उफाळण्‍याची शक्यता आहे.

कारवाईमुळे बोरकर गटात असंतोष

ज्‍यांना निलंबित केले, त्‍यापैकी प्रशांत पागी, ल्‍युसिओ रॉनकॉन, प्रेमानंद गावडे, डेग्‍ली फर्नांडिस, विशाल देसाई. आदित्‍य देसाई या सहाजणांनी २०२२ ची विधानसभा, तर मनिला शिरोडकर यांनी गत जिल्‍हा पंचायत निवडणूक ‘आरजी’च्‍या उमेदवारीवर लढविली होती. हे सर्वजण बोरकर यांच्‍याजवळचे असल्‍याने त्‍यांच्‍या गटात असंतोष निर्माण झाला अाहे.

वीरेशवर कारवाई होणार?

आमदार वीरेश बोरकर यांनीही यापूर्वी पक्षविरोधी कारवायांत सहभाग घेतला, ‘सीईसी’च्‍या बैठकांना दांडी मारली, असे आरोप अजय खोलकर आणि विश्‍‍वेश नाईक यांनी केले होते. त्‍यामुळे या दहाजणांप्रमाणेच आरजी आमदार बोरकर यांच्‍यावरही निलंबनाची कारवाई करणार का? याकडे सर्वांच्‍याच नजरा लागून आहेत.

‘आरजी’ने निलंबित केलेले पदाधिकारी

१. प्रशांत पागी

२. ल्‍युसिओ रॉनकॉन

३. मनिला शिरोडकर

४. राहुल नाईक

५. प्रेमानंद गावडे

६. डेग्‍ली फर्नांडिस

७. मेल्‍विन दा सिल्‍वा

८. विशाल देसाई

९. आदित्‍य देसाई

१०. संजन (सॅम) नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT