Rubert Pereira and Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha Election 2024 Result: आरजीच्या उमेदवारांनी खाल्ली 64 हजार मतं, 11 हजार 'नोटा'च्या खात्यात

Goa Lok Sabha Election 2024 Result: राज्यात भाजप आणि काँग्रेसला त्यांचे त्यांचे पारंपरिक गड राखण्यात यश आले आहे.

Pramod Yadav

Goa Lok Sabha Election 2024 Result

गोव्यातील दोन लोकसभा जागांचे चित्र स्पष्ट झाले असून, उत्तरेत भाजपच्या श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी बाजी मारली आहे. तर दक्षिणेत काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस (Viriato Fernandes) विजयी झाले आहेत. यात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवारांनी देखील लक्षणीय मते मिळवल्याचे अंतिम आकडेवारीतून समोर आले आहे.

उत्तर गोव्यात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब (Manoj Parab) निवडणूक लढवत होते. परबांना 45,693 मते मिळाली असून, उत्तरेत 6,328 जणांनी नोटाला पसंदी दिली आहे.

तर, दक्षिणेत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या रुबर्ट परेरा (Manoj Parab) यांना 18,885 मते मिळाली आहेत. तर, दक्षिणेत 4,837 जणांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

या मतांची मोजणी केली असता आरजीच्या दोन्ही उमेदवारांनी गोव्यात 64,345 मते मिळवली आहेत. तर नोटाच्या खात्यात 11,134 मते गेली आहेत.

कोणाला किती मते

उत्तर गोवा

श्रीपाद नाईक - 2,57,326 मते

रमाकांत खलप - 1,41,311 मते

(नाईक 1,16,015 मतांनी विजयी)

North Goa Detailed Result
South Goa Detailed Result

दक्षिण गोवा

विरियातो फर्नांडिस - 2,17,836 मते

पल्लवी धेंपे - 2,04,301 मते

(विरियातो 13,535 मतांनी विजयी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Theft: 'पोलिसांनी शोधले असते तर, चोर सापडले असते'! बायणा दरोड्यातील जखमीचा धक्कादायक खुलासा; सांगितला संपूर्ण थरार

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी! आपची 22 नावे जाहीर; काँग्रेस-आरजी-फॉरवर्ड युतीचा होणार फैसला, भाजप लढवणार 50 जागा

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

SCROLL FOR NEXT