Goa Lok Sabha Election 2024 Result: ...आणि सामाना बरोबरीत सुटला! पारंपारिक गड राखण्यात भाजप, काँग्रेसला यश

Goa Lok Sabha Election 2024 Result: गोव्यातील दोन जागांवरील अटीतटीच्या लढतीत उत्तरेत भाजपचे श्रीपाद नाईक आणि दक्षिणेत काँग्रेसचे विरियातो विजयी झाले आहेत.
Goa Winner Candidate| Viriato Fernandes South Goa | Shripad Naik North Goa
Goa Winner Candidate| Viriato Fernandes South Goa | Shripad Naik North GoaDainik Gomantak

Goa Lok Sabha Election 2024 Result

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल समोर आले असून, उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे. तर, दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस विजयी झाले आहेत. राज्यात भाजप आणि काँग्रेसला त्यांचे त्यांचे पारंपरिक गड राखण्यात यश आले आहे.

उत्तर गोवा

उत्तर गोव्यात भाजपच्या श्रीपाद नाईक आणि काँग्रेसच्या रमाकांत खलप यांच्या थेट लढत पाहायला मिळाली. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब देखील उत्तर गोव्यातून मैदानात होते. अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या या लढतीत अखेर श्रीपाद नाईक यांनी बाजी मारत, सलग सहाव्यांदा उत्तरेतील वर्चस्व सिद्ध केले आहे.

श्रीपाद नाईक यांना 2,53,812, रमाकांत खलप यांना 1,40,191 तर मनोज परब यांना 45,460 मते मिळाली आहेत. या लढतीत नाईकांनी 1,13,621 मते मिळवत विजय मिळवला आहे.

नाईकांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी ते एक लाख मतांनी विजयी होतील, असा दावा केला होता. निकालानंतर नाईकांनी हा दावा खरा ठरवला आहे.

आरोप प्रत्यारोप

उत्तरेत यावेळी टफ फाईट होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला. नाईक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. याशिवाय नाराज भंडारी समाज, आपच्या नेत्यांची ईडी चौकशी, म्हादईचा मुद्दा, एसटी समाजाचे राजकीय आरक्षण अशा मुद्यांवरुन नाईक यांना घेरण्यात आले. तर, दुसरीकडे खलप यांच्यावर म्हापसा अर्बन बँकेतील लाखो रुपये घोटाळ्याचे आरोप करण्यात आले.

अखेर नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांचा मतदारांवर फार फरक न पडल्याचे निकालातून दिसत आहेत.

Goa Winner Candidate| Viriato Fernandes South Goa | Shripad Naik North Goa
North Goa Lok Sabha Result 2024: श्रीपाद नाईकांनी करुन दाखवलं! तब्बल इतक्या लाख मतांनी उडवला काँग्रेसचा धुव्वा

दक्षिण गोवा

उत्तर गोव्यातील निकालाबाबात आश्वसत असलेल्या भाजपने दक्षिण गोव्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला संधी देऊन सर्व ताकद लावत पल्लवी धेंपे यांना विजयी करण्याचा निर्धार केला होता. यासाठी मोठ्या नेत्यांची फौज त्यांच्या पाठीशी उभी केली होती.

दरम्यान, भाजपने धेंपे यांना उमेदवारी दिल्यानंतर काही दिवासांनंतर काँग्रेसने कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर केली. धेंपेच्या प्रचारासाठी भाजपने अक्षरश: दक्षिण गोवा पिंजून काढला. अनेक कोपरा सभा घेण्यासह मोदींची भव्य देखील दक्षिणेतच झाली.

दुसरीकडे कॅप्टन यांनी प्रचाराला उशीरा सुरुवात केली मात्र, इंडिया आघाडीतील नेत्यांच्या मदतीने लोकांपर्यत पोहोचले.

विरियातोंना दक्षिणेत 2,17,836 मते मिळाली तर पल्लवी धेंपे यांना 2,04,301 मते मिळायेत. यात विरियातोंचा 13,535 मतांनी विजय झाला आहे. याशिवाय आरजीच्या रुबर्ट परेरा यांना 18,885 मते मिळाली.

विरियातो अडकले वादात

भारतीय संविधान गोव्यावर लादले असे व्यक्तव्य विरियातो फर्नांडिस यांनी केल्याने ते वादात सापडले. मोदींनी राष्ट्रीय स्तरावर याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. तसेच, धेंपे श्रीमंत घरातील असल्याने त्यांना गरीबांच्या व्यथा कळतील का? असा सवाल काहींना उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com