RG Party Dainik Gomantak
गोवा

RG Party:'पाकिस्तान झिंदाबाद' चा नारा देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

फोंडा तालुका आरजी पार्टीचे सदस्य तसेच नागरिकांनी फोंडा पोलिसांत केली तक्रार

Sumit Tambekar

पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या ओमरान खान पठाण आणि शफीउल्ला रा. दवर्ली मडगाव गोवा यांना अटक करा. अशी मागणी फोंडा तालुक्यातील रिवोल्यूशनरी गोवा पार्टीचे सदस्य तसेच नागरिकांनी आज फोंडा पोलिसांत केली आहे.

(Revolutionary Goans Party Ponda said File a case against those chanting "Pakistan Zindabad")

आरजी पार्टीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर सक्रिय असलेला ओमरान खान पठाण, व ओमरान शफीउल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण ते पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देत आहेत. यातील ओमरान खान पठाण हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या वादग्रस्त संघटनेचा सदस्य असल्याचं यावेळी सांगितलं.

दोघे ही पाकिस्तान झिंदाबाद"ची घोषणा देत असून राष्ट्रदोह आहे. त्यांच्यावर देशद्रोह कायद्याअंतर्गत आणि देशद्रोह कायद्याच्या कलम 124A आणि IPC च्या 153A अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार शफीउल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. ज्यात त्याने उघडपणे कबूल केले आहे की, ओमरान पठाणने त्याला असे करण्यास भाग पाडले.

आरजी पार्टीच्या सदस्यांनी म्हटले की ओमरान खान पठाण याच्याविरुद्ध यापुर्वी ही दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने आता जो गुन्हा केला आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आला आहे. ज्याची पोलिसांना पुढील चौकशी करण्यात मदत होईल. असे यावेळी त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT