Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: लाईव्ह व्हिडिओत अश्रू अनावर झालेले मनोज परब म्हणतात 'मला माफ करा'

मनोज परब यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Pramod Yadav

Manoj Parab: पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्‍न सुरू आहेत. पण कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये. पक्षाच्‍या कार्यकर्त्यांचे योगदान एक ना एक दिवस तरी गोमंतकीयांना आठवेल, असे आवाहन करणारा व्हिडिओ ‘आरजी’चे सुप्रीमो मनोज परब यांनी केले. यावेळी परब यांना अश्रू अनावर झाले.

मनोज परब यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर परब यांनी आज (शुक्रवारी) फेसबुकवरती एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

"लाईव्ह सुरु असताना मी भावूक झालो यासाठी मला माफ करा, मला माझ्या आरजी पक्षाचे कुटुंब मजबूत हवंय", अशी पोस्ट परब यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, परब यांनी गुरुवारी लाईव्ह व्हिडिओत पक्ष, पक्षाकडील शिल्लक पैसे यासह विविध विषयांवर भाष्य केले.

पक्षाच्या खात्यात सध्या केवळ दीड लाख रुपये शिल्लक आहेत. पक्षाच्‍या कार्यालयाचे तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. सभा, बैठकांमध्‍ये कार्यकर्त्यांना नाश्ता, चहा द्यायलाही पक्ष असमर्थ आहे आणि हीच वेदनादायक बाब आहे, असे मनोज परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

SCROLL FOR NEXT