Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Form-6 Annexure D For New Voters: निवडणूक आयोगाने 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या राज्यांमधील नवीन मतदारांसाठी मोठा दिलासा दिला.
Form 6 voter registration new rules
Form 6 additional declaration Election CommissionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Election Commission Form 6 latest update: निवडणूक आयोगाने 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या राज्यांमधील नवीन मतदारांसाठी मोठा दिलासा दिला.

नव्या मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-6 सोबत जोडलेला ॲडिशनल डिक्लेरेशनचा भाग आता 'ECINET' पोर्टलवरुन हटवण्यात आला. हा बदल आयोगाने 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर करण्यात आला असून, यामुळे आता नव्या मतदारांसाठी मतदार ओळखपत्र बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि सुलभ झाली.

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, देशात नवीन मतदार ओळखपत्र काढण्यासाठी किंवा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'फॉर्म-6' भरावा लागतो. अलीकडेच या फॉर्मसोबत ई-सिनेट पोर्टलवर एसआयआरशी संबंधित एक ॲडिशनल डिक्लेरेशन जोडलेले दिसून येत होते, ज्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता ज्या राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाली, त्या राज्यांसाठी पोर्टलवरुन हा अतिरिक्त भाग काढून टाकण्यात आला.

Form 6 voter registration new rules
Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्ट केले होते की, एसआयआर प्रक्रियेच्या मधल्या काळात म्हणजेच 'नॉन-एसआयआर पिरियड'मध्ये मतदार नोंदणीसाठी निर्वाचक रजिस्ट्रीकरण नियम, 1960 अंतर्गत निर्धारित केलेल्या सामान्य फॉर्मचाच वापर केला जाईल. या घोषणेनंतरच एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमधील ई-सिनेट पोर्टलवर फॉर्म-6 अद्ययावत करण्यात आला.

Form 6 voter registration new rules
'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

फॉर्म-6च्या नियमांनुसार, हा फॉर्म प्रामुख्याने नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जातो. कोणताही भारतीय नागरिक जेव्हा पहिल्यांदा मतदार म्हणून आपले नाव नोंदवू इच्छितो, तेव्हा त्याला हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून भरावा लागतो आणि सोबत काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.

एसआयआर अंतर्गत जोडलेल्या ॲडिशनल डिक्लेरेशनमध्ये अर्जदाराला जुन्या मतदार रेकॉर्डशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीची विचारणा केली जात होती. यामध्ये अर्जदाराचे नाव मागील एसआयआर दरम्यान अंतिम मतदार यादीत होते का, त्याचे नाव नसल्यास त्याचे आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव त्या यादीत नोंदवले होते का, यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. आता हा अतिरिक्त भाग हटवल्यामुळे नवीन मतदारांचा त्रास नक्कीच कमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com