RGP New Executive Committee Dainik Gomantak
गोवा

RGP State President: 'आरजीपी'ला मिळाले 'जेन-झी'नेतृत्व, 26 वर्षीय शविना राज्य अध्यक्षपदी; आमदार बोरकरांकडून नवी टीम जाहीर

RGP New Executive Committee: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) रविवारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून, अवघ्या २६ वर्षांच्या शविना नाईक शिरोडकर यांची अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Revolutionary Goans Party President

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) रविवारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून, अवघ्या २६ वर्षांच्या शविना नाईक शिरोडकर यांची अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. ‘जेन-झी’मध्ये मोडणाऱ्या शविना नाईक शिरोडकर यांच्यावर राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आरजीपीने तरुणाई आणि युवतींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार तथा आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेत राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने काही दिवसांपूर्वी आपण पक्षाच्या सर्वच समित्या बरखास्त केल्या होत्या. त्यानंतर आता नव्या समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील ४५ दिवसांत सर्व समित्या स्थापन केल्या जातील.

राज्यात सुमारे पाच लाख युवा मतदार आहेत. सोबतच ५२ टक्के महिला मतदार आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच २६ वर्षांच्या शविना नाईक शिरोडकर यांची राज्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. शविना युवा वर्ग आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देतील, असा विश्वास बोरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वांना सोबत घेऊन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही घवघवीत यश संपादन करू आणि नव्या सरकारमध्ये सहभागी असू. गोव्यासारख्या सुंदर राज्यातील युवा भविष्यासाठी काम करायाचे आहे.

- शविना नाईक शिरोडकर, राज्य अध्यक्ष, आरजीपी

राज्य कार्यकारिणी अशी

शविना शिरोडकर : अध्यक्ष

विपीन नाईक : उपाध्यक्ष

प्रेमानंद गावडे : सरचिटणीस (संघटना)

मेल्विन डिसिल्वा : सरचिटणीस

जयदत्त पाडोलकर : सचिव

कँडिडो कोरिया : खजिनदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT