Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Revolutionary Goans Party: या समितीने काही दिवसांपूर्वी दुसरे निलंबित सदस्‍य विश्‍‍वेश नाईक यांनाही अशीच नोटीस जारी केली होती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रिव्‍होल्युशनरी गोवन्स पक्षाच्‍या (आरजी) शिस्तपालन समितीने निलंबित सदस्य अजय खोलकर यांना नोटीस जारी करीत, निलंबनास कारणीभूत ठरलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी येत्‍या ७ ऑगस्‍ट रोजी समितीसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे. समितीचे अध्‍यक्ष प्रवीण हळर्णकर यांनी ही नोटीस जारी केली आहे.

खोलकर यांनी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा. घर क्र. ७६४/२, मालवाडा, आगशी येथे चौकशीसाठी उपस्थित राहावे. आपल्या बचावाच्या समर्थनार्थ सर्व संबंधित नोंदी आणि कागदपत्रे सोबत आणावीत, अशा सूचना समितीने केल्‍या आहेत. दरम्यान, या समितीने काही दिवसांपूर्वी दुसरे निलंबित सदस्‍य विश्‍‍वेश नाईक यांनाही अशीच नोटीस जारी केली होती; परंतु चौकशीला जाण्‍याआधीच नाईक यांनी ‘आरजी’ला रामराम केला होता.

स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी

शिवाय ही एक स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी असेल. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या संबंधित मुलाखती व कागदपत्रांचाही यावेळी विचार करण्‍यात येईल. खोलकर पुरेशा कारणाशिवाय उपस्थित राहण्यास असमर्थ ठरले, तर त्यांच्या अनुपस्थितीतच चौकशीची प्रक्रिया पुढे चालवली जाईल, असेही नोटिसीत नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT