Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘आरजी’चे समर्थन

मनोज परब यांची घोषणा; भ्रष्टाचार संपवण्यासाठी थोपटले दंड

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील पंचायत निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे कार्यकर्ते उतरणार असून त्यांना पक्षाकडून समर्थन दिले जाणार आहे. पंचायत स्तरावरील भ्रष्टाचार संपवण्यासाठी उमेदवार उतरवण्याचे ठरविले आहे. पंचायतीत लोकांची असलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना व्हावीत, हा उद्देश असल्याचे मत पक्षप्रमुख मनोज परब यांनी पणजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पक्षाचे अनेक कार्यकर्ते पंचायत निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना पक्षाचा पाठिंबा दिला जाईल. या पक्षाचा उद्देश पंचायत स्तरावरील विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा आहे. सरकारने या निवडणुकीत ओबीसी आरक्षणात गोलमाल केले आहे. मर्जीनुसार त्यांनी हे आरक्षण केले आहे. मतदारांचा हक्क चिरडला जात आहे, असा आरोप परब यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्‍वेश नाईक आणि रोहन कळंगुटकर उपस्थित होते.

राज्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीयांची संख्या वाढत असल्याने या पंचायती त्यांच्या हातात जाऊ लागल्या आहेत. दिवसेंदिवस प्रशासन पद्धत भ्रष्टाचार होऊ लागली आहे. मतदारांनाच त्यांच्या कामासाठी या पंचायत सदस्यांना लाच द्यावी लागत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी आरजीपीने शिक्षित तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरवून समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायतीवर निवडून आलेले पंचसदस्य सरकारची पोपटपंची करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT