<div class="paragraphs"><p>Manoj Parab</p></div>

Manoj Parab

 

Dainik Gomantak

गोवा

परप्रांतिय मतदारांची नावं यादीतून काढून टाकणार

दैनिक गोमन्तक

साखळी : साखळी मतदारसंघात साडेपाच हजार परप्रतियांची मते असून गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्सचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही सर्व मते काढून टाकण्यात येतील. राज्य सरकारकडून गोव्याची ओळख नष्ट केली जात आहे. गोव्याचे अस्तित्व जपण्याची गरज निर्माण झाली आहे. हे केवळ रिव्होल्युशनरी गोवन्सचे सरकार सत्तेवर आल्यानंतर करु शकेल, असा दावा रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी केला आहे.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स (Revolutionary Goans) गोव्यात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी साखळीकरांनी साथ द्यावी असे आवाहनही रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केले. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे साखळी येथील बोडके मैदानावर सभेचे आयोजन केले होते. या सभेला डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील कार्यकर्ते व समर्थकांची उपस्थिती होती.

गोव्यातील भाजप (BJP) सरकारने म्हादई कर्नाटकला विकल्याने भविष्यात राज्यात मोठी पाणी समस्या निर्माण होऊ शकते. गोव्यातील भाजप सरकार परप्रतियांचे लाड करत आले असल्याने स्थानिक युवकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे, असा गंभीर आरोप मनोज परब यांनी केला आहे. गोव्यातील (Goa) युवावर्ग मेहनती असूनही येथील युवक काम करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या पत्नी करत आहे हे चुकीचे आहे. त्या एक शिक्षिका असूनही मुलांकडे दुर्लक्ष करून नवऱ्याच्या चुकांवर स्पष्टीकरण देण्यासाठी नेहमी पुढे येत असल्याची टीकाही मनोज परब (Manoj Parab) यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT