Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : हिंमत असेल तर ‘आरजी’चे नाव घ्या!

रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचं आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावर शरसंधान

आदित्य जोशी

Revolutionary Goans Manoj Parab : आयडीसीचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी केलेल्या विधानावरून रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्‍याला एक दहशतवादी संघटनेकडून त्रास दिला जात असल्याचे विधान रेजिनाल्‍ड यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले होते. परंतु, त्यांच्या विधानावरून आरजी अधिकच आक्रमक झाली आहे. हिंमत असेल तर ‘आरजी’चे नाव घ्या, असे जाहीर आव्हान आरजीप्रमुख मनोज परब यांनी रेजिनाल्ड यांना केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

पोगो विधेयक विधानसभेत आपण खासगी सदस्य विधेयक दाखल करून मांडण्याच्या रेजिनाल्‍ड यांच्या विधानावरून हा वाद सुरू झाला होता. तेव्‍हा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर विधानसभा सचिवांकडून मागितलेल्या माहितीत असले कुठलेही खासगी सदस्य विधेयक दाखल न केल्याची माहिती विधानसभेत दिली होती. त्यानंतर बोरकर यांनी ही माहिती सार्वजनिक करताना रेजिनाल्ड यांचे पितळ उघडे पाडल्‍याची पोस्ट टाकली होती. याबाबत रेजिनाल्ड यांनी स्पष्टीकरण देत आपण अनेक वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर पोगो विधेयक असंविधानिक असल्याचे सांगितले होते. तेव्हा आपण ते सभापतींकडे पाठवले होते.

लॉरेन्स अप्रामाणिक

रेजिनाल्‍ड यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केली आहे. पोगो विधेयक असंविधानिक आहे, तर त्यांनी त्यातील मुद्दे विधानसभेत कसे मांडले. तसेच, गृहनिर्माण मंडळासाठी असलेले दहा वर्षांची मर्यादा ही वाढून 30 वर्षे केली होती. हा पोगो विधेयकाचा प्रभाव आहे. परंतु, रेजिनाल्ड हे केवळ नावापुरते प्रामाणिक आहे. कारण ते भाजपच्या विरोधात लढत होते आणि आज ते त्यांच्यासोबत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT