Goa Storm And Tree Damage Dainik Gomantak
गोवा

Goa Storm And Tree Damage: गोव्यात परतीच्या पावसाचा धूमाकूळ, मलपणला वादळाचा तडाखा; पडझडीमुळे लाखोंची हानी

Retreating Monsoon In Goa: गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मलपण-सत्तरी येथे मंगळवारी संध्‍याकाळी चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मलपण-सत्तरी येथे मंगळवारी संध्‍याकाळी चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. रस्‍त्‍यांवर झाडे पडल्‍यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

दोन ठिकाणी घरांवर झाडे पडली. मलपण येथील रोहिदास गावकर यांच्या घराचे पूर्ण पत्र्याचे छत वाऱ्याच्या तडाख्यात उडून गेले. त्‍यामुळे त्‍यांना सुमारे साडेचार ते पाच लाखांचे नुकसान झाले. तसेच झाडे रस्त्यावर पडताना अनेक ठिकाणी वीजखांब तसेच वीजवाहिन्‍यांवर कोसळल्‍याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे मलपण परिसर काळोखात होता.

सत्तरीत पावसाचा जोर सुरूच

सत्तरीत परतीच्या पावसाचा जोर सुरूच असून रोज दुपारनंतर जोरदार पावसाला सुरवात होते. त्यामुळे पडझडीच्या घटना सुरुच आहेत.

७ लाखांचे नुकसान

या पडझडीत सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू होते. दुपारी ३ च्या सुमारास जवानांनी सुरू केलेले मदतकार्य रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT