Retired soldier commits suicide in Bicholim Dainik Gomantak
गोवा

मुलांना सांभाळा, सॉरी..! म्हणत निवृत्तसैनिकाची आत्महत्या

‘गिरण व्यवसाय आणि मुलांना सांभाळा. सॉरी..!'' प्रवीण यांचा शेवटचा निरोप

दैनिक गोमन्तक

डिचोली: निवृत्त सैनिक (Retired soldier) असलेल्या भोळवाडा-कारापूर येथील 45 वर्षीय विवाहिताने आपल्या राहत्या घरासमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांचे नाव प्रवीण चुंबाळकर असे असून, सध्या ते सचिवालयात नोकरीला होते. सकाळी घरासमोरील अंगणात प्रवीण याचा मृतदेह लटकत असल्याचे त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आले. नंतर तिने एकच आक्रोश सुरु झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. नंतर उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी (GMCH) येथे पाठवण्यात आला.

सुसाईड नोटमध्ये काय?

प्रवीण यांनी जीवनाचा शेवट करण्यापुर्वी ‘गिरण व्यवसाय आणि मुलांना सांभाळा. सॉरी..!'' अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यात आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट नाही. त्यामुळे या घटनेमागे गूढ निर्माण झाले आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास चालू आहे. प्रवीण हे मये भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष ज्योत्स्ना चुंबाळकर यांचे पती होत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT