Tillari Dam News google image
गोवा

बार्देश तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी; पाणी जपून वापरा, पुढील काही दिवस मर्यादीत पुरवठा

तिळारी धरणातून अस्नोडा आणि पर्वरी पाणी प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे.

Pramod Yadav

बार्देश तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी असून, पुढील काही दिवस संपूर्ण तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काही दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या वतीने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तिळारी धरणातून अस्नोडा आणि पर्वरी पाणी प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. यामुळे सोमवारपासून (13 नोव्हेंबर) संपूर्ण तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे.

पाणी पुरवठा सुरळीत होण्याची तारीख विभागाने सांगितली नसून, प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी पूर्व पदावर आल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असे या पत्रकात म्हटले आहे.

तसेच, तालुक्यात विविध ठिकाणी पाणी सोडण्याच्या वेळेत देखील बदल होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया केंद्रात शिल्लक असलेल्या पाणी साठ्यावर वेळेत बदल केला जाईल, खात्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT