Gold Mine Collapse: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

Central African Republic Gold Mine Collapse: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकच्या पश्चिमेकडील भागात सोन्याची एक खाण अचानक खचल्याची दुर्घटना घडली.
Rescue operation after deadly gold mine accident
Central African Republic Gold Mine CollapseDainikGomantak
Published on
Updated on

Central African Republic Gold Mine Collapse: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकच्या पश्चिमेकडील भागात सोन्याची एक खाण अचानक खचल्याची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 30 खाणकामागारांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाना-मामबेरे प्रीफेक्चरमधील 'अब्बा' भागात ही घटना घडली असून, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरु आहे.

या दुर्घटनेतून सुदैवाने वाचलेल्या फ्लोरियन गागुएंडे या कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, ही एक पारंपरिक खाण होती जिथे आधुनिक तंत्रज्ञान किंवा सुरक्षेची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नव्हती. स्थानिक डेप्युटी मेयर सुलेमान बी यांनी सांगितले की, बचाव पथकांनी आणि स्थानिक लोकांनी कित्येक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून 30 मृतदेह बाहेर काढले. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले.

Rescue operation after deadly gold mine accident
Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

घटनेनंतर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चिखलाने माखलेले तरुण आणि महिला कामगार ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत, तर अनेक लोक मदतीसाठी आरडाओरड करत आहेत. सरकारी प्रवक्ते एव्हरेस्ट नगामाना यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबांप्रती संवेदना प्रकट केल्या. तसेच प्रभावित लोकांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

Rescue operation after deadly gold mine accident
Congo Ebola Outbreak 2026: इबोलाच्या नव्या उद्रेकानं आफ्रिकेत माजवला हाहाकार, काँगोमध्ये 65 जणांचा मृत्यू; 246 संशयित रुग्णांमुळे हादरली आरोग्य यंत्रणा!

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशात अशा प्रकारच्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या पारंपरिक खाणींमध्ये अपघातांची मालिका नवी नाही. या भागात हजारो नागरिक अत्यंत धोकादायक परिस्थितीत, पुरेशा सुरक्षा उपकरणांशिवाय आणि तांत्रिक मदतीविना लहान पातळीवर खाणकाम करतात. यामुळे दरवर्षी येथे असे भीषण आणि जीवघेणे अपघात (Accident) घडतात. याआधी जानेवारी 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीत 100 हून अधिक कामगारांचा अडकून मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली होती, ज्याच्या आठवणी या ताज्या दुर्घटनेमुळे पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com