Illegal Hill Cutting Dainik Gomantak
गोवा

Hill Cutting: ताळगावात डोंगरकापणी केलेला परिसर पूर्ववत करा!

Hill Cutting: डिसेंबरपर्यंत मुदत: न झाल्यास ‘सुरक्षा ठेव’ जप्त

दैनिक गोमन्तक

Hill Cutting: बेकायदा डोंगरकापणी केलेला परिसर पूर्ववत करण्यासाठी बंगल्याचा मालक इस्टोनिया फ्रांसिस्को आल्मेदा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शेवटची दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास मालकाने कामासाठीची जमा केलेली 10 लाखांची सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यात येईल.

तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवली आहे.

ताळगाव येथील बेकायदा डोंगरकापणीप्रकरणी ताळगावचे रहिवासी तथा माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. बंगल्यासाठी तेथील डोंगराची कापणी केल्याचे निदर्शनात आणल्यानंतर खंडपीठाने गंभीर दखल घेतली होती.

उच्च न्यायालयाने इस्टोनिया आल्मेदा यांना डोंगरकापणी केलेल्या परिसर पूर्वी होता त्या स्थितीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यांना 30 ऑक्टोबरची मुदत दिली होती.

अहवाल द्या!

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण ‘एनजीपीडीए’ने डोंगरकापणी केलेला परिसर पूर्ववत करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार ते काम करावे. या कामाचा प्राधिकरणाने महिन्यानंतरआढावा घ्यावा व त्यानंतर 8 जानेवारी 2024 पर्यंत कामासंदर्भात अहवाल खंडपीठाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT