Ponda Parking Dainik Gomantak
गोवा

Margao Parking Project: पार्किंग प्रकल्पावरील रेस्टॉरंट वादाच्या भोवऱ्यात

मडगाव नगराध्‍यक्षांचा खुलासा: रेस्‍टाॅरंटचा पालिका बैठकीत ठरावच झाला नाही

दैनिक गोमन्तक

मडगावातील जुन्‍या मासळी मार्केटच्‍या जागेवर उभारण्‍यात येणाऱ्या बहुमजली पार्किंग प्रकल्‍पावर रेस्‍टॉरंट उभारण्‍याचा प्रस्‍ताव सध्‍या वादग्रस्‍त ठरला असून या प्रकल्‍पाच्या वरच्या मजल्यावर रेस्‍टॉरंट उभारल्‍यास आम्‍ही न्‍यायालयात जाऊ, असा इशारा शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनी दिला आहे.

या पाश्‍‍र्वभूमीवर या प्रकल्‍पात रेस्‍टॉरंट उभारण्‍याचा कुठलाही ठराव पालिकेने घेतलेला नाही. त्‍यामुळे हा प्रस्‍ताव आला कुठून हेच कळत नाही. जर या प्रकल्‍पाच्‍या आराखड्यात बदल केलेला असेल, तर त्‍याची माहिती पालिका मंडळाला देणे आवश्‍‍यक होते, पण अशी माहिती कुणीही

आम्‍हाला दिलेली नाही असा धक्‍कादायक खुलासा नगराध्‍यक्ष दामू शिरोडकर यांनी केला आहे. असा कुठलाही प्रस्‍ताव आम्‍ही दिला नव्‍हता, अशी प्रतिक्रिया मडगावचे माजी नगराध्‍यक्ष लिंडन परेरा व घन:श्‍‍याम शिरोडकर यांनीही व्‍यक्‍त केली असून त्‍यामुळे हे प्रस्‍तावित रेस्‍टॉरंट वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहे.

नगरपालिकेचा हा बहुमजली पार्किंग प्रकल्‍प जी-सुडातर्फे उभारण्‍यात येत असून या प्रकल्‍पात रेस्‍टॉरंटसाठी जागा ठेवणार असे यापूर्वी आमदार दिगंबर कामत यांनीच स्‍पष्‍ट केले होते.

त्यांच्‍या प्रस्‍तावाचा मडगावच्‍या शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनी निषेध केला आहे. तशी व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या विरोधात कडक इशारा देताना पालिका आणि जी-सुडाकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाईल आणि गरज पडल्‍यास शॅडो कौन्‍सिल उच्‍च न्‍यायालयात जाईल, असे कुतिन्‍हो यांनी म्‍हटले आहे.

मी नगराध्‍यक्ष असताना हा प्रकल्‍प जी-सुडाकडून बांधून घ्‍यावा असा ठराव घेतला होता. त्‍यासाठी जी-सुडाला पैसे देण्‍याचे ठरले होते. मात्र, या प्रकल्‍पात रेस्‍टॉरंटचा समावेश करण्‍याचा कुणीही ठराव घेतला नव्‍हता. त्‍यामुळे हा रेस्‍टॉरंटचा प्रस्‍ताव कसा आला हे कळू शकत नाही.

- लिंडन परेरा, माजी नगराध्‍यक्ष

पार्किंग प्रकल्‍पात रेस्‍टॉरंट हा मोठा घोटाळा असून आमचा या प्रस्‍तावाला विरोध आहे. हा प्रस्‍ताव मान्‍य व्‍हावा यासाठी काही व्‍यापारी बॅगा घेऊन फिरत आहेत अशी वार्ता मडगावात पसरली आहे. तसे असेल तर कुठेतरी पाणी मुरते असे म्‍हणावे लागेल.

- घनश्‍‍याम शिरोडकर, माजी नगराध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT