Morocco Earthquake: मोरोक्कोत भूकंपाचा थरार, गोमंतकीय कन्येने व्यक्त केली ‘आपबिती'

वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर
Saavi Natekar
Saavi Natekar Dainik Gomantak

Morocco Earthquake: मोरोक्कोतील वास्तुरचनांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्तीवर तेथे गेलेल्या सावी मिलींद नाटेकर (वय 23 वर्षे) ही गोमंतकीय विद्यार्थिनी तेथील विध्वंसक भूकंपातून सहीसलामत बचावली.

विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडली, तेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या मारकेश शहरातच ती होती. तेथून ती आता फेज या सुरक्षित शहराकडे रेल्वेने निघाली.

तिथे जाण्यापूर्वी तिने वडिलांना मोबाईलवर आपण सुखरूप असल्याचा संदेश पाठवला. या संदेशानंतर तिच्या कुटुंबीयांच्या जीवात जीव आला.

Saavi Natekar
Tribal Leaders: दिलजमाईमुळे गोविंद गावडेंना मिळणार आदिवासी खाते?

बचावासाठी गोव्यातून हलवली सूत्रे

नाटेकर कुटुंबीयांना मोरोक्कोतील भूकंपाची माहिती मिळाली, तेव्हा सारेच घाबरले. ती सुखरूप आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होत नव्हता.

त्यामुळे वडिलांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अनिवासी गोमंतकीयांचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांना हा विषय सांगितला.

मोरोक्कोतील भारतीय दूतावासाला टॅग करून सावईकर यांनी ट्विट केले. त्यानंतर दूतावासाने सावीशी संपर्क साधून तिच्या प्रवासाची व्यवस्था केली.

Saavi Natekar
Vijai Sardesai: मडगावकरांना पर्याय देण्यास गोवा फॉरवर्ड समर्थ

राहते शहरच होते भूकंपाचे केंद्र

भूकंपामुळे वीजप्रवाह खंडित झाल्याने सावीचा मोबाईल बंद झाला. इंटरनेट सेवाही बंद झाल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर भारतीय दूतावासाने संपर्क साधल्यावर तिने आपण सुखरूप असल्याचा मोबाईल संदेश वडिलांना पाठवला.

विशेष म्हणजे, भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या मारकेश शहरातच सावी राहात होती. मात्र, ती या संकटातून सहीसलामत बचावली असून ती सुखरूप आहे.

Saavi Natekar
Vasco Traffic News: वास्कोत बसवलेले 62 सीसीटीव्ही कॅमेरे निकामी; वाहतूक पोलिसांच्या तपासात अडथळे

सावी मोरोक्कोत हॉस्टेलमध्ये राहायला होती. भूकंपग्रस्त नागरिकांचे प्रशासनाने स्थलांतर केले असून सावीही सुरक्षित आहे. तिने आम्हाला फोन करून आपण सुखरूप असल्याचा संदेश दिला. तिच्या फोनची बॅटरी कमी असल्याने आम्ही जास्त वेळ तिच्याशी फोनवर बोलू शकलो नाही.

- मिलिंद नाटेकर, सावीचे वडील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com