Calangute Restaurant Fire Dainik Gomantak
गोवा

Calangute Restaurant Fire: कळंगुट-बागा येथील क्लबला आग

अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

Akshay Nirmale

Calangute Restaurant Fire: कळंगुट-बागा येथील मुख्य बाजारपेठेतील एका पब, बार कम रेस्टॉरंटला भीषण आग लागली आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने सध्या या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

या क्लबच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. क्षणार्धात आगीने मोठे रूप धारण केले. आग लागली तेव्हा या क्लबमध्ये काही ग्राहक होते. पण आग लागल्याचे समजताच सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

याच क्लबमध्ये काही महिन्यांपुर्वी आगीची घटना घडली होती. स्थानिक प्रभाग सदस्य स्वप्नेश वायंगणकर यांनी या आगीच्या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत सध्या तरी जीवीतहानीचे कोणतेही वृत्त नाही. तथापि, रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT