Purument Fest Dainik Gomantak
गोवा

Gomantak Purument Fest': घरगुती उत्पादनांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

गोमन्तक तनिष्का पुरूमेंत फेस्तला प्रतिसाद : सहभागी महिलांनी व्यक्त केले समाधान

गोमन्तक डिजिटल टीम

‘गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’द्वारे ग्रामीण महिलांना पुरुमेंताचे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून द्यावी, तसेच शहरातील रहिवाशांना पुरुमेंतासाठी लागणारे सर्व साहित्य, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळावेत, या हेतूने ‘तनिष्का’द्वारे कांपाल येथील सेंट ओरिआसो गार्डनमध्ये उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या पहिल्याच ‘गोमन्तक पुरूमेंत फेस्त’ला चांगला प्रतिसाद लाभला. पहिलेच फेस्त यशस्वी ठरले.

पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या महिलांनी आणलेल्या विविध घरगुती उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

भविष्यातही महिलांच्या मिळकतीत वाढ व्हावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम गोमन्तक तनिष्का व्यासपीठाद्वारे आयोजित करावेत, असे आवाहनदेखील सहभागी विविध गटांच्या महिलांनी केले.

मी राज्य सरकारद्वारे आयोजित विविध महोत्सवात माझी घरगुती उत्पादने विकते. यंदा पहिल्यांदाच आयोजित गोमन्तक तनिष्का पुरुमेंतात मी सहभागी झाले. मला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

उत्तम प्रकारे आयोजन केल्याने कोणत्याच प्रकारची गैरसोय झाली नाही. यंदा मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे पुढच्या वर्षीच्या गोमन्तक पुरूमेंत फेस्ताची आतुरता लागली आहे.

- गीता मांद्रेकर, घरगुती उत्पादने विक्रेती

गोमन्तक तनिष्का व्यासपीठाद्वारे आयोजित पुरूमेंत फेस्तात सहभागी होऊन आपल्या उत्पादनांची विक्री करता आली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

उत्तम प्रकारे आयोजन, स्टॉल्सधारकांना उत्तम प्रकारच्या सेवा पुरवल्या. भविष्यातही गोमन्तक तनिष्का व्यासपीठाद्वारे अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत.

- साधना गायकवाड, संयोजक, गोमंतक फूड प्रॉडक्ट

मी गावठी खोबरेल तेल, लाडू व इतर साहित्य स्वतः बनविलेली उत्पादने विक्रीसाठी आणली. सर्व उत्पादने खपली. त्यातही खोबरेल तेलाला चांगली मागणी होती.

माझ्याकडून अनेक ग्राहकांनी कोणी 1 लिटर, कोणी अर्धा लिटर असे तेल नेले. गोमन्तक तनिष्का व्यासपीठामुळे आम्ही राजधानीत आपली उत्पादने विकू शकलो, याबाबत समाधान वाटत आहे.

- ज्योती वळवईकर, तनिष्का गट, वास्को

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT